बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ छगन भुजबळ यांची जरांगेंवर जोरदार टीका
 
भिवंडी : “माझा कार्यक्रम करतो, मला बघतो, 24 डिसेंबरला नाशिकला भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय होतं, आमंत्रण दिलं जातं. वा रे वा जरांगे काय तुझी हिंमत, अरे तू तुझी तब्येत सांभाळ. बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ, मला धमकी देतो”, अशा खोचक शब्दांत छगन भुजबळ यांनी टीका केल्या. ओबीसींचा एल्गार मेळावा आज भिवंडीत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. “जरांगे सांगतात, एकटा खातो, अरे ते काय लाडू आहेत का खायला? तू सासरच्या घरच्या भाकरी खातोय ना? खा तिकडे”, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली.
“आम्हाला रोज शिव्या घालतात. एवढी मोठी दादागिरी आहे की, त्या जरांगेची बैठक आहे म्हणून जालना जिल्हा परिषदेने सगळ्यांना सुट्टीच जाहीर केली. पंतप्रधानांची बैठक असली तरी सुट्टी नाही, पण त्याची बैठक असेल तर सुट्टी. हे असंच चाललं तर ही लोकशाही नाही, फक्त दादागिरी राहील. गुन्हेगारांना पकडलं तर सांगतात, सोडा त्यांना, आमची लेकरंबाळं आहेत, लेकरंबाळं पिस्तूल घेऊन फिरतात? झुंडशाही सुरु आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
“जातगणना आहे, कळेल कोण किती आहे. आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणात सुविधा मिळायला पाहिजेत. आता त्याने सांगितलं की, आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू, दादागिरी सुरु, आरक्षण मिळू द्या, भुजबळाचा कार्यक्रम करतो, असं जरागे म्हणाले. आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, असं जरांगे म्हणाले. वा रे वा, ही काय दादागिरी आहे? असा सवाल छगन भुजबळांनी केला.
“हा जरांगे आपली लायकी काढतो. काहीही बोलतो. मला बोलतो, येवल्याचा यडपाट आहे. काय सांगायचं? एक म्हण आहे, आधीच मरकटं, त्यामध्ये मध्य प्याला. म्हणजे आधीच माकड त्यात बेवडा प्यायला. अरे आमची लायकील तू काय पाहतोस. माझ्याकडे एमपीएससीचा जो रिपोर्ट आहे, 106 मार्काला कट ऑफ आहे. ओबीसीचा कट ऑफ 106.5 ला आहे. आम्ही 0.5 ने पुढे आहे. धनगर समाजही 106.5 आहे. आमची लायकी नाही? आमची लायकी काढता. आमची मुलं हुशार आहेत”, असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना दिलं.
“आजकाल काय चाललंय, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, जय शिवाजी जय भवानी म्हणून, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवाजी म्हणायचं आणि आमच्यावर हल्ला करायचा? छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मराठा सैनिक लढले म्हणून घेतला जात नाही. छत्रपतींचा इतिहास मावळे घेऊन लढले असा केला जातो. ते मावळे आम्ही आहोत. त्यामध्ये सगळे होते. मराठे होते तसे रामोशी, आग्री, कोळी, सोमकोळी, मुस्लिम, महार, मांग, माळी होते”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“याला गावबंदी, त्याला गावबंदी, सगळ्यांना गावबंदी, पण रोहित पवार यांचं स्वागत, रोहित पवारांची तिथे बैठक होते. त्यामध्ये कुणी बोललं तर दुसऱ्या दिवशी तो मुलगा हॉस्पिटलला दाखल होतो. विशिष्ट लोकांना गावबंदी नाही”, असं भुजबळ म्हणाले.