मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हुतात्म्यांना अभिवादन
 
मुंबई, दि. २१: महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकास करण्याची संकल्पना मांडली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री   शिंदे म्हणाले की, २१ नोव्हेंबर हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस असून यानिमित्त केवळ अभिवादन, पुष्पचक्र अर्पण करून चालणार नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाच्या आठवणीचा हा दिवस आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदिंनीही पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.