उप मुख्यमंत्री व पणन मंत्री माझ्या जवळचे 'मी जो बोलणार तेच होणार' अस सांगणाऱ्या कार्यवाहू सभापती अशोक डक यांना मोठा झटका!
Mumbai Apmc : राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबई Apmc मार्केट पाहणी दौऱ्यानंतर   मंत्रालयात दोन दिवसांची वैठक घेण्यात आली ,पहिल्या बैठकीत पणन सचिव , पणन संचालक ,मुंबई Apmc सचिव ,सहसचिव व अभियंता सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ,या बैठकीत कार्यवाहू सभापती अशोक डक बाहेर बसवण्यात आले होते . मंत्र्यांनी बाजारसमितीच्या कारभाराबद्दलं   मार्केटच्या अधिकाऱ्यांकडून सर्व विषयावर   माहिती जाणून घेतली ,
दुसऱ्या दिवशी बैठकीत पणन मंत्र्यांनी सर्व साचालकांची बैठक बोलावली, पणन मंत्र्याचे खाजगी सचिव कडून सर्व संचालकनावन टू वन फोन call द्वारे   या बैठकीसाठीउपस्थित   राहावे अशी सूचना देण्यात आली ,महत्त्वाचे बाब अशी आहे की अशोक डक यांना डावलून पणन मंत्र्यांकडून संचालकना फ़ोन कॉल करण्यात आली . 
संचालकना मंत्र्याकडून फोन कॉल आल्यावर नागपूर पासून मुंबई पर्यंत संचालक धावपळ करून मंत्रालय गाठलं ,संचालकना वाटले की आता सभापती व उप सभापतीच्या निवडणूक लागणार आहे त्यामुळे सर्व संचालक खूश झाले ,मात्र या बैठकीत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सभापती व उप सभापतीच्या निवडणुकीचा विषय पुढे ढकलण्यात आला ,त्यामुळे   गोव्यातून मौजमस्ती करुन, तसेच सभापती व उप सभापतीची निवड करुन परत आलेल्या संचालकना निराशा व्हावे लागले आहे.
पणन मंत्र्यांकडून निराश झाल्यानंतर कार्यवाहू सभापती अशोक डक हे   काही संचालकाना घेवून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले होते , मात्र अजित दादांकडून देखील समाधानकारक उत्तर न मिळाल्याने डक यांचा पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. अजित दादांनी सांगितले की, माझ्या खात्याची कामं असतील तर सांगा, मी पणन मंत्र्याना याविषयावर कुठलाही आदेश देऊ शकत नाही ,तसेच त्यांच्या खात्यामध्ये मी हस्तखेप   करणार नाही ,यापुढे पणन खात्याच्या विषयावर बोलायचं नाही ,अशी तंबी अजित दादांनी डक यांना दिल्याची माहिती एका संचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे, त्यामुळे अशोक डक यांना मोठा झटका बसला आहे. अजित दादा व पणन मंत्री माझ्या जवळचे आहेत असे सांगणारे कार्यवाहू सभापती अशोक डक यांची चांगलीच गोची झाली आहे ,डक यांची अशी परिस्थिती झाली आहे की “ ना घरका ना घाटका” .