पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् शरद पवार यांच्यांत दिलखुलास संवाद झाला का?
पुणे : देशातील राजकारणात दोन विरोधी नेते आज एका व्यासपीठावर एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि इंडिया या भाजप विरोधातील आघाडीच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र आले. यामुळे त्यांच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आता या नेत्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवले गेले आहे. यावेळी, मोदी यांनी शरद पवार यांच्यासमोर येताच त्यांच्या हातात हात दिला. शरद पवार यांनीही स्मितहास्य करत मोदी यांची पाठ थोपटली. दोन्ही नेते व्यासपीठावर सहजपणे वावरले.
गांधीजी यांनी लोकमान्य यांना काय म्हटले
भगवद्गीतेतील कर्मयोगाची समज लोकमान्य टिळक यांनी दिली. भगवद्गीतेचे लोकमान्य टिळक गाढे अभ्यासक होते. त्यांना भारताच्या साम्राज्यावर विश्वास होता. गांधी यांनी लोकमान्य टिळकांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले होते, असे मोदी यांनी म्हटले.
पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
अविश्वासाचे वातावरणात विकास होऊ शकत नाही. मागील 9 वर्षात भारताच्या लोकांनी परिवर्तन करुन दाखवले आहे. देश आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. देशातील नागरिकांनी हे करुन दाखवले आहे.
मोदी यांनी केली मराठीतून सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. देशाला अनेक नायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमिकेला मी वंदन करतो, असे सांगत मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. लोकमान्य टिळक पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या पुरस्कारमुळे जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सेवेत कोणतीही कमतरता ठेवणार नाही. लोकमान्य टिळकांची छाप प्रत्येक ठिकाणी होती. टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा बदलली.
पहिली सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांची- शरद पवार
केसरी आणि मराठाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांना घाम फोडला होता. गणेशोत्सव, शिवजयंती यामध्ये टिळक यांच मोठ योगदान आहे. अलिकडच्या काळात या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. परंतु देशातील पहिली सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांच्या काळात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे कापली होती, असे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मोदी यांच्या कामगिरीचे कौतूक केले.