भारत राष्ट्र समिती पक्षाची ग्रामपंचायत निवडणुकीत टेलर, विदर्भात काँग्रेस अन् नाना पटोले यांना दिला जोर का झटका
BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री, काँग्रेसला विदर्भात धक्का
कोकणातून ठाकरे गटासाठी बॅड न्यूज
दुपारी 2 वाजेपर्यंत 2359 ग्रामपंचायतींपैकी भाजपाने सर्वाधिक 383, शिंदे गट 197, दादा गटाने 239 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. काँग्रेस 112, पवार गट 89 आणि ठाकरे गट 80 असे आकडे आहेत.
विदर्भातील निकाल अधिकच धक्कादायक आहे. विदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्ष म्हणजे BRS ने चांगलेच यश मिळवले आहे. 
या पक्षाने काँग्रेसला धक्का दिला आहे. विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकीत   बीआरएस पक्षाने 9 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. नाना पटोले यांच्या भंडार जिल्ह्यात राव यांच्या पक्षाने दमदार कामगिरी केली आहे.
• भाजपा –   383
• शिंदे गट – 197
• ठाकरे गट – 80
• काँग्रेस – 112
• शरद पवार गट – 89
• अजित पवार गट – 239
ही आताची
• महायुती - 1101
•   महाविकास आघाडी –414