मला उद्धव ठाकरेंची विकेट काढायचीच होती, राणेंनी सांगितला मातोश्रीमधील तो किस्सा!
-शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद
Narayan Rane on Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांना 'गेट आऊट' म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहेत? ते मुख्यमंत्री असताना त्यांनाच जनतेनं 'गेट आऊट' केलं, या शब्दात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली. नारायण राणे यावेळी बोलताना ते शिवसेनेत असताना मातोश्रीमध्ये घडलेला एक किस्सा देखील सांगितला.
मातोश्रीमध्ये काय घडलं?
मी शिवसेनेत असताना मला एकदा मातोश्रीहून बोलावणं आलं. मी बाळासाहेबांना भेटलो. तेंव्हा उद्धव यांनी बोलावलं असल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं. मी वर गेलो. उद्धव ठाकरे नवे कपडे ट्राय करुन बघत होते. त्यांनी शर्ट, पँट, जॅकेट अंगावर चढवलं. त्यानंतर वरपासून खालपर्यंत एकच असलेला पोशाख घाला. मला उद्धव यांनी कसा दिसतो ते विचारलो. मलाही त्यांची विकेट काढायची होती. मी म्हंटलं साहेब उत्तम दिसतोय. तुमच्या व्यक्तिमत्तवाला शोभून दिसत आहे. तेंव्हापासून त्यांनी तोच ड्रेस घालायला सुरुवात केली,' असा किस्सा राणे यांनी सांगितला.
उद्धव ठाकरेंनी कधी कुणाचा 
का? असा मेंगळट आम्हाला मुख्यमंत्री नको. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. त्या काळात फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले, असं सांगत नारायण राणे यांनी ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली.
'शरद पवार काडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात'
नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. 'पुतळा पडला राजकारण नको, आपण एकत्र येऊन चांगला पुतळा करुया असं बोलला असता तर तुमची कीर्ति वाढली असती. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या आरक्षणात पण तुम्ही राजकारण खेळतायत. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वत:च्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत.
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्या नंतर मला शिव्या देणारा माणूस हा शरद पवारांचा कार्यकर्ता निघाल. शिव्या देऊन मला काहीही होणार नाही. पेट्रोल टाकून आणि काडी घेऊनच फिरायचं याला महाराष्ट्रात स्थान नाही,' अशी टीका राणे यांनी केली.
'संजय राऊत यांना अटक करा'
शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर तो पडल्याचे फोटो संजय राऊत यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. निवडणुकीच्या तोंडावर राज्यात दंगल घडवण्याचं त्यांचं कारस्थान आहे. त्यांना तातडीनं अटक करावी, अशी मागणी राणे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली.