PM Narendra Modi |आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प, 834 इमारती, 30 हजार फ्लॅट, मोदींच्या हस्ते झालं लोकार्पण
 
समोर विशाल जनसमुदाय, मोदींच्या डोळ्यात अश्रू, कंठ दाटला, सोलापुरात नेमकं काय घडलं?
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्रात सोलापुरच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांच्याहस्ते काही प्रकल्पाच भूमिपूजन झालं. काही प्रोजेक्टसच उद्गटन झालं. या दरम्यान पंतप्रधान मोदी भावूक झाल्याच पहायला मिळालं. पीएम आवास योजनेतंर्गत आज सर्वात मोठ्या सोसायटीच लोकार्पण झालं. ‘जर मला लहानपणी अशा घरात रहायला मिळाल असतं तर…’ हे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात अश्रू तरळले. काही सेकंद ते थांबले. त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यावेळी मोदी म्हणाले की, “आज मी या गोष्टी पाहतो, तेव्हा मनाला समाधान मिळतं. हजारो कुटुंबचा स्वप्न साकार होतय”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाचा उल्लेख केला. “आपल्या सर्वांसाठी ही भक्तीरसाने भरलेली वेळ आहे. 22 जानेवारीला तो ऐतिहासिक क्षण येणार आहे, ज्यावेळी भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होतील. अनेक दशकापासूनचा आराध्यच तंबूत दर्शन घेताना होणारा त्रास दूर होणार आहे. रामललाच्या प्राण प्रतिष्ठेआधी काही संतांच्या मार्गदर्शनानुसार मी काही गोष्टींच पालन करतोय. हा योगायोग आहे, माझ्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिक पंचवटीमधून झाली” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘हे रामराज्यच आहे’
“श्रीरामच्या आदर्शावर चालून देशात सुशासन हा आमच्या सरकारचा पहिल्यादिवसापासून प्रयत्न राहिला आहे. देशात प्रामाणिकपणाच राज्य असलं पाहिजे. हे रामराज्यच आहे, ज्याने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासची प्रेरणा दिली. माझ सरकार गरीबांना समर्पित आहे हे मी 2014 मध्ये सरकार बनल्यानंतरच म्हटलं होतं. आम्ही अशा योजना सुरु केल्या की, त्यामुळे गरीबांच्या अडचणी कमी व्हाव्यात जीवन सोप बनेल”
सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा हा गृह प्रकल्प आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून रे नगर फेडरेशनने हा प्रकल्प उभारला आहे. 30 हजार घरांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये 834 इमारती आहेत. 1 BHK चे 30 हजार फ्लॅट आहेत. 365 एकर मैदानात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातील 30 हजारांपैकी 15 हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आली . विशेष म्हणजे या घरांची मालकी महिलांच्या नावाने असणार आहे. १५ हजार घरांच्या चाव्यांचे वितरण यावेळी होणार आहे.
काय काय आहे प्रकल्पात
गृह प्रकल्पात क्रीडांगण,   स्किल डेव्हलपमेंट सेंटर, योगा सेंटर तसेच 24 अंगणवाडी आणि 6 प्राथमिक शाळा उभारण्यात आल्या आहेत. 1 आरोग्य केंद्र, विजेचे उपकेंद्र उभारले आहे. त्यात 24 तास पाणी आणि वीज असणार आहे.