तीन टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या… मनोज जरांगे यांच्या बीडच्या रॅलीची जय्यत तयारी
Manoj Jarange Patil उद्या बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे. याच सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उद्या मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्रित येणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी मोठी तयारी केली आहे. उद्या येणाऱ्या मराठा बांधवांसाठी तब्बल तीन टन खिचडी करण्यात येणार आहे. तर चार लाख पाणी बॉटल्स आणि एक ट्रक केळी वाटप करण्यात येणार आहे.
उद्या 23 डिसेंबर रोजी बीड मधील पाटील मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभास्थळी आढावा घेतला आहे. सभेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि मराठा समन्वयकांमध्ये चांगला समन्वय आहे. ज्या बाबी महत्त्वाच्या वाटल्या त्यावर चर्चा झालीय. सभेसाठी येणाऱ्या आणि महामार्गावरील प्रवाशांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीत बदल देखील करण्यात आलेला आहे. सभेच्या दिवशी या मार्गावर जड वाहतूक बंद केली जाईल केवळ अत्यावश्यक वाहनांनाच महामार्गावरून मार्ग मिळणार आहे. तर उपद्रवी लोकांवर लक्ष असल्याचे देखील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.
तीन टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या अशी आहे सभेची तयारी
उद्या बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे. याच सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उद्या मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्रित येणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी मोठी तयारी केली आहे. उद्या येणाऱ्या मराठा बांधवांसाठी तब्बल तीन टन खिचडी करण्यात येणार आहे. तर चार लाख पाणी बॉटल्स आणि एक ट्रक केळी वाटप करण्यात येणार आहे. उद्या होणारी सभा ऐतिहासिक होणार आहे. अगदी शांततेत ही सभा पार पडणार असल्याचा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला आहे.
भगव्या पताकांनी मैदान सजले
जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे. त्याच निमित्ताने पाटील मैदान सज्ज झाले आहे. जरांगे यांची उद्या रॅली आहे त्याच पार्श्भूमीवर बीड शहर भगव्या पताक्याने सजवण्यात आले आहे. शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्याचे सजावट करण्यात आले आहे. धुळे रस्त्यावरील पाटील मैदानात भव्य सभा होणार आहे.
जरांगे पाटलांनी दिलेला अल्टीमेटम 24 डिसेंबरला संपणार
24 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम संपणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे . सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटलांचा इशारा नेमका सरकारला काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होणार आहे.