'भाजपच्या मनात पाकिस्तान ठाकरेंनी घेरलं, 'त्या गोष्टी बाहेर काढल्या
उद्धव ठाकरे यांनी पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्क येथील सभेनंतर ठाकरे पलटवार करणार हे निश्चित होते. त्यानुसार मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भाजपला पाकिस्तानच्या मुद्द्यावरून घेरले. येवढेच नाही तर जुन्या गोष्टी काढत अनेक प्रश्नही उपस्थित केले. शिवाय भाजपकडून पाकिस्तानचा उल्लेख या निवडणुकीत वारंवार का होत आहे यामागचे राजही त्यांनी सांगितले.
भाजपच्या मनात पाकिस्तान का?
निवडणूक प्रचारात भाजपकडून पाकिस्तानचा वारंवार उल्लेख होत आहे. देशाची निवडणूक असताना पाकिस्तानचा उल्लेख का? अशी विचारणा विरोधक करत आहेत. देशाच्या समस्यांवर बोला. बेरोजगारी, महागाईवर बोला. भविष्यात काय करणार आहात त्यावर बोला असा आव्हान दिले जात आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनीही भाजपला घेरले आहे. मनी वसे तसे स्वप्न दिसे असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. भाजपच्या मनात सतत पाकिस्तान आहे. कारण ते न बोलवता पाकिस्तानला गेले होते. तिथे त्यांनी केक खाल्ला होता. त्याची चव अजूनही त्यांच्या जिभेवरून गेली नसावी, त्यामुळेच त्यांना पाकिस्तानची आठवण येते का असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
म्हणून पाकिस्तानचा भूत बाहेर काढलं'
देशात सध्या महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहेत. जनता महागाईवर तोडगा मागत आहे. तरूण नोकऱ्या मागत आहेत. गरीब अन्न मागत आहेत. या प्रश्नांची उत्तरं भाजपकडे नाहीत म्हणूनच पाकिस्तानचं भूत अशा वेळी बाहेर काढलं जातं असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पाकिस्तानची भीती दाखवली जाते. खऱ्या प्रश्नाना सामोरे जाण्याची ताकद भाजपकडे नाही असेही ठाकरे यावेळी म्हणाले. शिवाय भाजपला गद्दांरांची घराणेशाही चालते, पण आमची आणि प्रमोद महाजनांची चालत नाही असेही ते म्हणाले.
'चार जूनला जुमला पर्व संपणार'
4 जूनला जुमला पर्व संपणार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्या दिवसापासून अच्छे दिनची सुरूवात होईल. कारण इंडिया आघाडीचं सरकार येत आहे असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग होतोय. भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. मुंबईची लूट चालवली आहे. मुंबई लुटून गुजरातला देण्याचे काम सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर मुंबई लुट आम्ही थांबवू असे आश्वासनही त्यांनी दिले. शिवाजी पार्कवर भटकलेले लोक काल एकत्र होते. अशी टिकाही त्यांनी केली.
'भाजप आरएसएस वर बॅन लावणार'
ठाकरे यांनी या पुढे जाऊन भाजपवर गंभीर आरोप लावला आहे. भविष्यात हे आरएसएसवर बंदी घाण्यास मागेपुढे पाहाणार नाही असे ते म्हणाले. संघाला शंभर वर्ष होत आहेत. पण संघासाठी शंभराव वरिस धोक्याचं ठरू शकते असेही ते म्हणाले. भाजपने अशी तयारी करणे म्हणजे ही हुकुमशाहीची नांदी आहे. असेही ते म्हणाले.