सर्वात मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना हटवण्याचे आदेश
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयुक्त इक्बाल सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने फक्त मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले नाहीत तर देशातील 6 राज्यांच्या गृह सचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.