ट्रम्पेटचा गोंधळ कायम, निवडणूक चिन्हातील साधर्म्यामुळे शरद पवारांचे 7 आमदार पराभूत
-यंदाही ट्रम्पेट आणि तुतारी या दोन्ही चिन्हामध्ये मतदारांचा गोंधळ उडाल्याचं दिसून येत आहे.
मुंबई: लोकसभा निवडणुकीत तुतारी फुंकणारा माणूस आणि टम्पेट या चिन्हामध्ये साधर्म्यामुळे शरद पवार गटाला फटका सहन करावा लागला होता. त्यानंतर विधानसभेत शरद पवार गटाचे तब्बल 7 उमेदवार पराभूत झाल्याचं चित्र आहे. यंदाही ट्रम्पेट आणि तुतारी या दोन्ही चिन्हामध्ये मतदारांचा गोंधळ उडाल्याचं दिसून येत आहे.
लोकसभेची अनुभव लक्षात घेता विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे ट्रम्पेट हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ती फेटाळून लावली होती. लोकसभेत ट्रम्पेट या चिन्हाला मिळालेला प्रतिसाद पाहून विधानसभेत अनेक अपक्षांकडून या चिन्हाची मागणी केली जात होती. विधानसभेत तब्बल 163 मतदारसंघात ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आले होते.
कोणत्या मतदारसंघात बसला फटका?
जिंतूर मतदारसंघ... 
शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांचा 4554 मतांनी पराभव झाला तर ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या विनोद भावळे यांना 7430 मतं मिळाली.
घनसावंगी मतदारसंघ... 
शरद पवार गटाचे राजेश टोपे यांना 2309 मतांनी पराभव झाला. तर ट्रम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला 4830 मतं मिळाली.
शहापूर मतदारसंघ..
शरद पवार गटाचे पांडुरुंग बरोरा यांचा 1672 मतांनी पराभव
ट्रम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला 3892 मतं मिळाली
बेलापूर मतदारसंघ...
शरद पवार गटाचे संदीप नाईक यांचा 377 मतांनी पराभव
ट्रम्पेट चिन्हावर उभा असलेला उमेदवार प्रफुल म्हात्रे यांना 2860 मतं
अणुशक्ति नगर मतदारसंघ
शरद पवार गटाचे फाहद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव
ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या जयप्रकाश अग्रवाल यांचा 4075 मतं मिळाली
आंबेगाव मतदारसंघ...
शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांचा 1523मतांनी पराभव. येथून अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील निवडून आले.
येथे देवदत्त शिवाजीराव निकम नावाच्या दुसऱ्या उमेदवाराला 2965 मतं मिळाली, यांचे निवडणूक चिन्ह ट्रम्पेड होतं.
पारनर मतदारसंघ…
शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव..
अजित पवार गटाचे काशिनाथ दाते विजयी झाले. ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या सखाराम सारक यांना 3582मतं मिळाली आहेत.