सातारा लोकसभा मतदार संघात विजयाची तुतारीच फूंकणार
सातारामधून शशिकांत शिंदे याना उमेदवारी जाहीर झाल्यावर मुंबई APMC मार्केटमध्ये जोरदार स्वागत
मार्केटमधील मंदिरात   दर्शन घेऊन स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला
-शशिकांत शिंदेंनी माथाडी कामगारांवर सोपवली जबाबदारी
लोकशाही, माथाडी कामगार, उद्योग जिवंत ठेवायचा असेल तर तुतारी घेतलेला माणूस प्रत्येक घराघरात पोहचवा
माथाडी कामगारांना शशिकांत शिंदेंनी केले आवाहन
नवी मुबई : आमदार शशिकांत शिंदे यांना साताऱ्याची उमेदवारी जाहीर झाली असून नवी मुबईतील APMC   मार्केटमध्ये शशिकांत शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.एपीएमसीच्या पाचही मार्केटमधील मंदिरात   दर्शन घेऊन स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. त्यानंतर माथाडी भवन येथे आण्णा साहेब पाटील यांच्या पुतळ्याला हार घालत माथाडी कामगार नागरिकांशी संवाद साधला यावेळी शशिकांत शिंदेंनी माथाडी कामगारांवर जबाबदारी सोपवली आहे. एक महिना माझ्यासाठी माझ्या पक्षासाठी कष्ट करा. पाचही मार्केट मध्ये जाऊन प्रचार करा, लोकशाही, माथाडी कामगार, उद्योग जिवंत ठेवायचा असेल तर तुतारी घेतलेला माणूस प्रत्येक घराघरात पोहचवा, तुमच्या विश्वासावर हा निर्णय होऊ शकतो असा विश्वास आमदार   शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगारांना संबोधित करताना व्यक्त केला आहे.
ठाणे जिल्ह्यात अडीच लाख माथाडी कामगार ठरवणार शशिकांत शिंदे यांचा भवितव्य
नवी मुंबई ,कळंबोलीसह ठाण्यात जवळपास अडीच लाख माथाडी कामगार वास्तव करतात …या माथाडी कामगारांमध्ये ८० टक्के कामगार शशिकांत शिंदे यांच्या सोवत आहेत …माथाडी भवन मधे सर्व माथाडी कामगारांची वैठक झाली यामध्ये माथाडी नेता नरेंद्र पाटील सुद्धा उपस्थित होते …माथाडी कामगार संपत चालले आहेत जर माथाडी कामगाराच्या विषय सोडायचं तर माथाडी नेता शशिकांत शिंदे यांना पाठिंबा द्या अशी या बैठकातून निर्णय घेण्यात आला आहे ..