उप मुख्यमंत्री व पणन मंत्र्यांकडून आचारसंहिता भंग! आचार संहिता लागूनसुद्धा APMC कर्मचारी मंत्र्याकडे कार्यरत
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे .आचार संहिता लागून ५ दिवस उलटले आहेत तरी देखील   मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून मंत्रालयात विविध पदावर काम करण्यासाठी देण्यात आलेले   कर्मचारी अजून बाजारसमिती कडे आले नाही . राज्याचे उप मुख्यमंत्री ,पणन मंत्री सह प्रधान सचिवाकडे कार्यरत असलेले   कर्मचारी ,शिपाई ,वाहन चालक ,सुरक्षा कर्मी असे एकूण ११ जण अद्याप आलेलं   नाही त्यामुळे मंत्र्याकडून आचारसंहिताचा भंग करण्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे .
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधे सध्या अधिकारी व कर्मचारी सेवानिबृत होत आहे, त्यामुळे दिवसादिवस अधिकारी व कर्मचारी   कमी होऊ लागले आहेत. बाजार समिती प्रशासनाकडून मंत्री व   वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखभाल करण्यासाठी   वाहन चालक,सहायक सचिव ,कर्मचारी ,शिपाई ,सुरक्षा कर्मचारी असे एकूण ११ जण मंत्रालयात विविध पदावर काम पाहत आहेत .आचार संहिता लागूनसुद्धा   ते लोक अजून अधिकारी व मंत्र्याकडे   ठाण   मांडून बसले आहेत ,बाजार समिती कडून पणन मंत्री   व सभापतींना देण्यात आलेल्या वाहन परत मागवण्यात आली असून आता पर्यंत कर्मचारी परत आलेले   नाही.   त्यामुळे आचार संहिताच्या उल्लंघन   होत नाही का? अशी चर्चा बाजार आवारत होत आहे . राज्याचे ऊप मुख्यमंत्री अजितदादा पवार,पणनमंत्री अब्दुल सत्तार ,चंद्रकांत दादा पाटील ,प्रधान सचिव यांच्या कडे क्लर्क   ,शिपाई ,वाहन चालक,सुरक्षा कर्मी ठाण मांडून बसलेले आहेत   .या कर्मचाऱ्यांना बाजार समिती प्रशासन कधी बोलावणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागली आहे .