काँग्रेसच्या पराभवास जबादार कोण? राहुल गांधी, कमलनाथ, अशोक गेहलोत, भूपेश बघेल की अन्य कोणी...कार्यकर्ते म्हणतात...
 
नई दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीपैकी चार राज्यांत रविवारी मतमोजणी झाली. दुपारी १ वाजेपर्यंत निवडणूक निकाल जवळपास स्पष्ट झाले. काँग्रेसने या निवडणुकीत आपल्याकडे असणारी दोन राज्य गमवली. भाजपने मात्र एक राज्य कायम ठेवत आणखी दोन राज्यात सत्ता मिळवली. तेलंगणात मात्र काँग्रेसला यश मिळत आहे. परंतु राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? त्यासाठी कोणाला ‘बलि का बरका’ बनवला गेला, हे आता समोर आले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पराभवाचे खापर इलेक्ट्रीक व्होटर मशिन म्हणजे EVM वर फोडले आहे. कार्यकर्त्यांनी इव्हीएम विरोधात घोषणाबाजी करत प्रदर्शन केले.
काँग्रेसने पुन्हा फोडले EVM
काँग्रेसची राजस्थानमध्ये सत्ता होती. त्या ठिकाणी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याकडे पक्षाची कामान होती. राहुल गांधी यांनी या ठिकाणी सभा घेतल्या होत्या. राजस्थानमधील कलानुसार काँग्रेस १९९ जागांपैकी केवळ ७० जागांवर आघाडीवर आहे. भाजपने ११४ जागांवर आघाडी घेतली आहे. परंतु या ठिकाणी काँग्रेसचा पराभवास ईव्हीएम जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करत आहे. त्यामुळे नवी दिल्लीत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.
छत्तासगडमध्ये भूपेश बघेल यांची सत्ता होती. परंतु या ठिकाणी त्यांना सत्ता टिकवता आली नाही. छत्तीसगडमध्ये ९० पैकी ५३ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेस ३६ जागा मिळताना दिसत आहे. यामुळे या ठिकाणी एक्झिट पोलचे अंदाजही फोल ठरताना दिसत आहे. काँग्रेसच्या पराभवास जबादार कोण याची चर्चा आता सुरु झाली आहे. राहुल गांधी, कमलनाथ, अशोक गेहलोत, भूपेश बघेल की अन्य कोणी…तर कार्यकर्ते एव्हीएमवर खापर फोडत आहे. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यलयाबाहेरचे वातावरण बदलले आहे. या ठिकाणी सकाळी विजयाच्या जल्लोषाची तयारी झाली होती. परंतु आता आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन इव्हीएम मशिनविरोधात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी इव्हीएमने मतदान बंद करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहे.