Big Breaking: IAS अनिल रामोडला लाच घेताना पुण्यात अटक : घरातील नोटा मोजण्यासाठी सीबीआयने आणले दोन मशीन
पुणे: पुणे महसूल विभागातील एका अतिउच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी सीबीआयच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. यावेळी छाप्यानंतर काहीच वेळात पोलिसांनी पैसे मोजण्याचे दोन मशिन्स तर मागवलेच शिवाय पैसे मोजण्यासाठी काही बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले.
पुणे महसूल विभागा(Pune Revenue Department) चे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या घरी सीबीआयने शुक्रवारी   छापे टाकले. यावेळी त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता सीबीआयने ताब्यात घेतलेल्या रामोड यांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातून त्यांनी किती मालमत्ता जमा केली असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या बाणेर गावातील ऋतूपूर्ण सोसायटीत दुपारी एकच्या सुमारास ‘सीबीआय’(CBI)चे सुमारे 10 ते 12 अधिकारी आले. यामध्ये काही महिला अधिकाऱ्यांच्या समावेश होता. सोसायटीच्या सुरक्षेला न जुमानता या आधिकाऱ्यांनी त्यांनी थेट इमारतीच्या ‘सी’ विंगमधील चौथ्या मजल्यावर जात रामोड यांच्या घराचा ताबा घेतला.घराचा दरवाजा लावून घेत त्यांनी चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.