चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण - मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
पुणे: अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार आहे. केरळमध्ये अजून मान्सूनला अनुकूल सर्व घटक तयार झालेले नाही. सध्या चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होत आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीवादळाची तीव्रता, अरबी समुद्रातील निर्मितीचे स्थान आणि त्यानंतरच्या हालचालीचा केरळवर नैऋत्य मान्सूनच्या प्रारंभावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील १२ तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, परंतु मच्छिमारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.मंगळवार सकाळपर्यंत चक्रीवादळ आणखी मजबूत झाले अन् आग्नेय अरबी समुद्रावर पसरले. हे सध्या गोव्याच्या 920 किमी पश्चिम-नैऋत्येस, मुंबईच्या 1,120 किमी दक्षिण-नैऋत्य दिशेला आहे. हे चक्रीवादळ पाकिस्तानकडे जात असून त्याचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर परिणाम होणार नाही, असा अंदाज आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर पुढील 24 तासांत चक्री वादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2021 मध्ये मान्सून सुरू होण्यापूर्वी चक्रीवादळ आले होते. 2023 मध्ये उत्तर हिंदी महासागरात तीन आठवड्यांत निर्माण होणारे हे दुसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळाने बांगलादेश आणि म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.