उन्हाच्या तडाख्या पासून सुटका - मान्सून साठी अनुकूल वातावरण तयार
पुणे: लवकरच बरसणार पावसाच्या सरी. यंदाच्या वर्षात गरमीने सगळ्यांनाच हैराण केलं होत. मे महिन्याचे दोन दिवस राहिले आहेत. सोमवारी अन् मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आता भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात कधी पसरणार आहे, याची माहितीच जारी केली आहे. राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत तर मुंबई अन् कोकणात 8 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार आहे.
पुणे शहरात रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. शहरातील अनेक भागात रात्रभर सुरू होता. मंगळवारी शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. आज दिवसभर पुणे शहरासह मराठवाडा, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.