Pune Apmc : कृषी बाजार समितीमधील मासळी बाजाराच्या विरोधात मोर्चा
Fish Market In APMC पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रस्तावित मासळी आणि चिकनच्या बाजाराला विरोध करण्यासाठी विविध बाजार घटकांकडून समितीच्या मुख्यालयावर सोमवारी   मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी नगरसेवक प्रवीण चोरबोले, दि पूना चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, अडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक बापू भोसले, माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मासळी बाजाराचा ठराव रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या मागणीचे निवेदन सचिव राजाराम धोंडकर यांना देण्यात आले.यावेळी बाजार समितीचे संचालक गणेश घुले, संतोष नांगरे उपस्थित होते. यावेळी घुले आणि नांगरे यांनी मासळी बाजाराचा ठराव रद्द करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.