पुणे मर्चंट्स चेंबर निवडणूक रंगात – 15 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात
.jpeg)
पुणे, एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
सन २०२५-२०२७ या काळाकरिता दि पूना मर्चंट्स चेंबरच्या द्विवार्षिक निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत १५ कार्यकारी पदांसाठी तब्बल ३० उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
या निवडणुकीकरिता सुरुवातीला ४३ उमेदवारांनी अर्ज नेले होते. त्यापैकी ४१ अर्ज दाखल झाले. छाननीनंतर ३२ अर्ज वैध ठरले. मात्र, २ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असल्याने अखेर १५ जागांसाठी ३० उमेदवार स्पर्धेत उभे राहिले आहेत.
रिंगणातील उमेदवारांची नावे
आगरवाल अशोक मोतीराम, आगरवाल सुभाष बाळकृष्ण, बांठिया राजेंद्र मोहनलाल, बांठिया उत्तम मोहनलाल, बोरा अजित केशरचंद, भळगट नंदकुमार गेनमल, चोरडिया गणेश आलमचंद, चोरबेले प्रवीण माणिकचंद, चौधरी हरीराम भैराजी, दुगड आशिष माणिकचंद, गोयल मुकेश सतिश, गोयल नविन जयभगवान, गुजराथी कन्हैयालाल गोविंददास, गुगळे राजेंद्र श्रीमल, जैन संदिप सुलेखचंद, लड्डा शाम भगवानदास, मेहता दिनेश दिलीप, मुधा विजय चंद्रकांत, नहार ईश्वर मोतीलाल, नहार प्रकाशकुमार चंदुलाल, नहार रायकुमार माणिकचंद, नहार विजय तेजमल, ओस्तवाल हर्षद हरकचंद, पालरेचा सुभाषकुमार कांतीलाल, फुलफगर राजेश पोपटलाल, राजपुरोहित महिपालसिंह, रायसोनी सचिन दिलीप, सेटिया अजित गौतमचंद, शिंगवी राजेंद्र पुनमचंद व शहा संदिप हसमूखलाल.
मतदान प्रक्रिया
या निवडणुकीचे मतदान गुरुवार, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार असून, मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदानाची व्यवस्था दि पूना मर्चंट्स चेंबरच्या गुलटेकडी मार्केटयार्ड येथील व्यापार भवनात करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना
दि पूना मर्चंट्स चेंबर ही गुलटेकडी मार्केटयार्ड, नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ व रविवार पेठ या भागातील जीवनावश्यक खाद्यान्न वस्तूंचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची अग्रगण्य संघटना आहे. या संघटनेचे एकूण ५८६ सभासद असून, व्यापार क्षेत्रात या चेंबरचा प्रभाव मोठा मानला जातो.
निवडणूक अधिकारी
या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून कंपनी सेक्रेटरी श्री. मिलिंदजी कसोडेकर आणि ऑफिस सेक्रेटरी सौ. अनिता कुलकर्णी कार्यरत आहेत.
ही निवडणूक व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण करणारी ठरत असून, १५ जागांसाठी ३० उमेदवारांमध्ये रंगणार्या या लढतीकडे संपूर्ण व्यापारी समाजाचे लक्ष लागले आहे.