Rain Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम
Pune Weather Update सूर्य तळपू लागल्याने उन्हाचा (Heat) चटका चांगलाच तापदायक ठरत आहे.   चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद झाली.यातच राज्यात वादळी पाऊस Stormy Rain) सुरू असून, आज   मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा (Rain Forecast) इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उन्हाचा चटका असह्य होऊ लागल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूरसह ब्रह्मपूरी येथे तापमान ४३ अंशांवर होते.
वर्धा येथे ४२ अंश, सोलापूर, अमरावती, नागपूर येथे तापमान ४१ अंशांच्या पुढे पोचले आहे. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३६ ते ४१ अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका वाढतच आहे.नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.तर उत्तर छत्तीसगडपासून, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक पर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत.या पूरक स्थितीमुळे आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.