एपीएमसी दक्षता पथकाची एमआयडीसीत धाड

5
0
Share:

आज महापे MIDC मध्ये APMC च्या दक्षता विभागाने कारवाई करून बाजारसमितीचा कर बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना पकडला. व्हिजलन्स पथकाने या कारवाईत २ गाड्या पकडल्या आहेत पहिली गाडी ही गुजरात वरून इथे आलेली तर दुसरी गाडी ही मध्यप्रदेश वरून अली होती. या दोन्ही गाड्या महापे MIDC मध्ये खाली करत होते.

पहिली गाडी ही मध्यप्रदेश वरून आली होती वाहन क्र. MP09 HH4204 या गाडीमध्ये शेतमाल हा गहू हा होता या गाडीत जवळजवळ गव्हाच्या 1200 गोण्या होत्या वजन 30 टन होते आणि या मालाचा बाजारभाव हा 7,74,137 रु इतका आहे आणि हा शेतमाल पाठविणारे अरमानिया ऍग्रो प्रोसेस मध्यप्रदेश आणि हा शेतमाल घेणारे मेसर्स एव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड हे आहेत याचं ऑफिस c-40 टिटीसी इंडस्ट्रियल एरिया पवना गाव नवी मुंबई इथे आहे. दक्षता पथकाने या गाडीवर सदरची कारवाई करून बाजार फी आणि दंड 35,412 रु वसूल करण्यात आले.

गाडी क्रमांक दोन ही गाडी गुजरात वरून आली आहे या गाडीत शेतमाल हा जिरा होता 500 गोणी जिरा या गाडीत होता आणि या वाहनाचा क्रमांक GJ02 XX1203 हा आहे या गाडीतला शेतमाल पाठवनारे भाईलाल त्रिकमलाल अँड कंपनी उमजा, गुजरात आणि शेतमाल घेणारे हे ग्लोबल एक्झिम A-337 टिटीसी इंडस्ट्रियल एरिया पवने तुर्भे MIDC मध्ये ऑफिस आहे. या पकडलेल्या शेतमालाचा बाजारभाव हा 20,15,500 ₹ इतका आहे आणि या पकडलेल्या मालावर दक्षता विभागाने बाजार फी आणि दंड 74,400 ₹ वसूल करण्यात आले. ही संपूर्ण सदरची कारवाई ही महाराष्ट्र कृषी व पणन (विकास व विनियमन) आणि 1963 अधिनियम 32 (9) नुसार सदरची वसुली आणि कारवाई करण्यात आली आहे आणि ही कारवाई APMC चे प्रशासक सतीश सोनी आणि सचिव ए के चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता विभागाचे प्रमुख बी डी कामिठे आणि शिवनाथ वाघ यांच्या संपूर्ण पथकाने ही सदरची कारवाई केली आहे.

ही कारवाई काय नवी नाही आहे या पूर्वी देखील दक्षता पथकाने अशा प्रकारे धाडी टाकून अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांन वर कारवाई केली आहे. काही दिवसां आगोदरच कोपरखैरणे येथे सेक्टर 21 मध्ये जिमी टॉवर जवळ असलेल्या गोडावून मध्ये अनधिकृतपणे काजू व्यवसाय सुरू होता यांवर दक्षता पथकाने कारवाई करून काजूचे 350 डबे जप्त केले या सदरची मालाची बाजारभाव किंमत 24 लाख 50 हजार रुपये इतकी होती या सदरच्या मालाची बाजार फी आणि दंड 28 हजार 400 रुपयांची नोटीस सुरेश कोकण या सदरच्या व्यापाऱ्याला दिली आहे.

Share: