मुंबई Apmc मार्केटमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘मिशन एपीएमसी’ ; अभिजीत बांगर

11
0
Share:

*ना मास्क,ना सोशल डिस्टनसिंग, एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये नियमांची सर्रास पायमल्ली,ग्राहक,माथाडी कामगार व व्यापाऱ्याचा आरोग्य धोक्यात*

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबधितांची संख्या 35 हजार पार झाली असून आतापर्यंत 750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनामुळे व्यपारी,माथाडी कामगार व कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे .वेळीच आवर घातला नाही तर खूप मोठं संकट येण्याची भीती आहे.यामुळे एपीएमसी मधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी धडक मोहीम सुरू केली आहे.पाचही मार्केटमध्ये भरारी पथक तैनात करण्यात आला आहे.बाजार आवारात सोशल डिस्टनसिंग व मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे.तसेच त्यांची दुकान सील करून कारवाई केला जाणार आहे .
एकीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना असं सांगितलं की, मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर एपीएमसी मार्केटमध्ये सर्व नियम शिथील केले असून. बाजार आवारात ना मास्क, वापरला जातो ना सोशल डिस्टनसिंग चे पालन केले जाते. मार्केटमध्ये विविध राज्यातून शेतमाल येत असतो. मार्केटमध्ये गाड्याची आवक वाढली असून दररोज मार्केटमध्ये 1000 ते 1500 गाड्यांची आवक होत असते.भाजीपला मार्केटमध्ये दरदिवशी 25 ते 30 हजार लोकांची ये जा हो आहे,यामुळे बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत आहे. मार्केटमध्ये ना- मास्क, ना सोशल डिस्टनसिंग चे पालन केले जाते.महापालिकेतर्फे मार्केटमध्ये अँटिझन टेस्ट करण्यात येत आहे मात्र एपीएमसी आरोग्य अधिकारी येत नसल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे,
भाजीपाला मार्केट रात्री 10 पासून सुरू होऊन सकाळी 11 वाजता संपते.घाऊक बाजारात किरकोळ व्यापार व पॅसेजमध्ये अनधिकृत व्यापारामुळे लोकांची गर्दी असते.वारंवार सांगून देखील व्यापारी मार्केटमध्ये ना मास्क,ना सोशल डिस्टनसिंगचे पालन करत नाही.याबाबत मार्केट उप सचिव वी डि कामिठे यांनी सांगितले की ‘मार्केटमध्ये कोरोना फोरणा काही नाही तुम्ही मीडिया वाल्याने वाढून दाखवतात , भाजीपला मार्केटमध्ये दर दिवसात 12 ते 15 हजार लोक ये जा करत असतात 3 महिन्यात कारवाई फक्त 150 जणांवर करण्यात आला आहे. भाजीपाला मार्केट उप सचिव कारवाईच्या नावाखाली खानापूर्ती केले आहे.

Share: