मनसे नेते अमित ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक मोर्चाला मोठं यश,नवी मुंबई मनपाचे ६,५०० कंत्राटी कामगारांच्या खात्यात पगारातील थकबाकी ९० कोटी रुपये मिळणार

4
0
Share:
-नवी मुंबई  मनपा स्थायी समिती मध्ये ६,५०० कंत्राटी कामगारांच्या खात्यात पगारातील थकबाकी ९० कोटी रुपये जमा करण्याची प्रस्ताव  मंजुरी .
मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर कंत्राटी कामगारांचा फटाके वाजवून व पेढे भरवून जल्लोष साजरा.
नवी मुंबई: मनसेच्या मुंबईतील पहिल्या महाअधिवेशनामध्ये  राज ठाकरे  यांचे सुपुत्र  अमित ठाकरेंची नेतेपदी निवड करून त्याचं राजकारणामध्ये लॉन्चिंग करण्यात आलं आहे तर आज २४ जानेवारी २०२० नवी मुंबई  मनपा स्थायी समिती मध्ये ६,५०० कंत्राटी कामगारांच्या खात्यात पगारातील थकबाकी ९० कोटी रुपये जमा करण्याची प्रस्ताव  मंजुरी करण्यात आली आहे त्यामुळे मनसे नेत्यातर्फे हा पहिल्या ऐतिहासिक मोर्चाला यश मििळाल सांगितल्या जात आहे।
नवी मुंबई महानगर पालिकेच्या घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा, उद्यान तसेच आरोग्य यांसारख्या एकूण १७ विभागात कार्यरत असलेल्या ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या थकीत वेतनातील फरक ९० कोटी रुपये कंत्राटी कामगारांना मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कंत्राटी कामगारांचा थालिनाद महामोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात ३ ते ४ हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला. आज २४ जानेवारी २०२० रोजी स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. पुढील आठवड्यात कामगारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पहिल्या ऐतिहासिक मोर्चाला मोठं यश मिळालेलं असल्याचे बोललं जात आहे.
कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून कंत्राटी कामगारांकडून शुक्रवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर फटाके वाजवून व पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. कालच मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात अमित ठाकरे यांची मनसे नेतेपदी निवड करण्यात आली आणि आज कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समितीकडून मंजूर करण्यात आला आहे. हा निव्वळ सुवर्णक्षण असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.
-कंत्राटी कामगार मुकुंद बर्डे यांनी सांगितले की या पूर्वी बरेच कामगार युनियन कडे गेलो पण आम्हाला कुठे न्याय मिळाली नव्हते मनसे नेते अमित ठाकरे हस्तक्षेप  मुळे आम्हाला आमची थकबाकी मिळणार आहे।
Share: