डाळींब उत्पादकाला विविध रोगांमुळे डाळिंबाचे 60 टक्क्यांहून अधिक नुकसान

17
0
Share:

यंदा बदलत्या वातावरणाचा फटका, डाळींब उत्पादकाला

विविध रोगांमुळे डाळिंबाचे 60 टक्क्यांहून अधिक नुकसान

सांगली: या पावसाळी वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग रोग, करपा, फुलगळ अशा विविध समस्या आढळून येत आहे.या समस्येला सांगली जिल्ह्यातील डाळींब उत्पादकाला तोंड द्यावे लागते,जवळपास 60टक्क्यांहून अधिक नुकसान होऊ शकते.

सातारा जिल्ह्यात विविध तालुक्यात प्रामुख्याने मोठं मोठ्या डाळींबाच्या बागा आहेत.जिल्ह्यात साधारण 10 हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्र असून प्रामुख्याने मृग हंगाम धरला जातो.दोन वर्षांपूर्वी दुष्काळाने शेतकरी त्रस्त होता.त्यातून टँकरने पाणी देऊन डाळिंबाच्या बागा वाचवल्या होत्या.

गतवर्षी अति पावसामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे 20 ते 25 टक्यांनी उत्पादन घटत गेले,दरात देखील मोठी घसरण झाली.उत्पादकाला आर्थिक तुडवडा सहन करावा लागला.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे दुष्काळी पट्ट्यात पाणीसाठा चांगला असल्याने डाळींब उत्पादकाला दिलासा मिळाला.

Share: