श्रीमान स्वप्नवीस’ क्लाईड क्रास्टोंची देवेंद्र फडणवीसांवर कुंचल्यातून टीका

8
0
Share:

*’श्रीमान स्वप्नवीस’*
*क्लाईड क्रास्टोंची देवेंद्र फडणवीसांवर कुंचल्यातून टीका…*

मुंबई दि.  मी पुन्हा येईन… मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल अशी स्वप्न भाजप कार्यकर्त्यांना दाखवणारे देवेंद्र फडणवीस हे आता ‘श्रीमान स्वप्नवीस’ झाले असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून लगावला आहे.

भाजपाचे वेगवेगळे विषय आणि त्यांची वक्तव्य यावर क्लाईड क्रास्टो आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून सतत फटकारे मारत असतात. सत्तेत असताना आणि सत्तेबाहेर असतानाही देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आणि स्वप्न अजून लपलेली नाहीत. आता तर मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळेच त्यांच्या या स्वप्नांना ‘श्रीमान स्वप्नवीस’ असे टायटल देत क्लाईड क्रास्टो यांनी जोरदार प्रहार केला आहे.

Share: