मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती मध्ये तत्कालीन संचालकांनी केला होता आर्थिक लूटमार.

18
0
Share:

-स्वतःच्या महागगड्या होउन सुद्धा बाजार समितीचे गाडीची वापर.

-बाजार समिती कडून देण्यात आलेल्या गाड्याची 2 रुपये प्रति किलोमीटर.

-कमी दरात गाड्या देउन सुद्धा या संचालकांनी बाजार समितीचे ब्याच सोबत 23 लाख 16 हजार 207 रुपये थकबाकी केले आहेत.

-बाजार समिती कडून सर्व माजी संचालकाना नोटीस बाजविण्यात आली आहे.

 

नवी मुंबई-एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना, शेतक-यांच्या जीवावर चालवल्या जाणा-या  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बटाटा, भाजीपाला, फळे, मसाला आणि दाणा मार्केट अशी पाच मार्केट आहेत. या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल अडत्यामार्फत किरकोळ व्यापाऱ्यांना विकला जातो.

या शेतमालावर व्यापाऱ्यांना सेझ भरावा लागतो. रोज लाखोंचा सेझ इथे गोळा केला जातो. त्यातूनच कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार चालतात. मात्र बाजार समितीच्या प्रशासन आणि तत्कालीन संचालक मंडळानं नियमबाह्य पद्धतीनं या पैशांतूनच, विविध उच्चपदस्थांसाठी भेटवस्तू आणि  बाजार समितीच्या गाड्याची वापर करून अक्षरशः लाखोंची उधळपट्टी केल्याचं दिसून आलंय.विशेष म्हणजे अशा प्रकारे खर्च करण्याची कोणतीच तरतूद बाजार समितीच्या नियमावलीत नाही. सध्या सुरू असलेल्या बाजार समितीच्या ऑडिट मध्ये अशे भोंगळ कारभार दिसुन आल आहे, 2008 ते 2013 दरम्यान 25 संचालकांनी मुंबई एपीएमसीकडून आपल्या वेगवेगळ्या कामासाठी गाड्याची वापर केले होते ज्यामध्ये 18 संचालकांनी वापरलेल्या गाड्याची थकबाकी ब्याज जोडून 23 लाख 26 हजार 207 रुपये आता पर्यंत भरले नव्हते असे ऑडिट मध्ये दिसून आले आहे .या मध्ये बाजार समितीचे तत्कालीन सभापती बाळासाहेब सोलासकर वर 10 लाख 26 हजार 810 रुपये आणि 17 संचालकांवर एकूण 23 लाख 16 हजार 207 रुपये थकबाकी आहेत ,सध्या बाजार समिती मध्ये निवडणूक तयारी जोरदार सुरू आहे त्यामुळे बाजार समितीने थकबाकी असलेल्या माजी संचालकांना नोटीस बाजवली असून भाजीपाला मार्केटच शंकर पिंगळे,फळ मार्केटच संजय पानसरे,दत्तात्रय पाटील,प्रभू पाटील,प्रदीप खोपडे या 5 संचालकांनी पैसे भरले आहेत बाकी संचालकांना पैसे भरण्यासाठी नोटिस पाठवण्यात आले आहे.दोन वेळा नोटीस पाठवून पैसे भरले नव्हते येणाऱ्या निवडणूक मध्ये उभा राहण्यासाठी या माजी संचालकांनी पैसे भरले अशी चर्चा बाजार समिती मध्ये होत आहेत .

-एकूण थकबाकी असलेल्या संचालकांच्या नाव खालील प्रमाणे-

1)-बाळासाहेब सोळस्कर-10 लाख 26 हजार810.
2)-दिलीप काळे-1लाख 73 हजार 746.
3)-प्रदीपरा खोपडे-68 हजार 307
4)-विलासराव महाले-71 हजार 649
5)-देबीनंदा  रोहणीकर-  2 लाख 35 हजार 551
6)-चित्राताई तुंगरे-4 लाख 21 हजार 274
7)-विलासराव मार्कर-27 हजार 120
8)-जितेंद्र दिहाडे-340
9)-प्रभू पाटील-22 हजार 758
10)-पांडुरंग पाटील-4 हजार 601
11)-दत्तात्रय पाटील-95 हजार 472
12)-बापूसाहेब भुजबळ-380
13)-संजय पानसरे-1हजार 313
14)-अशोक वाळुंज-63 हजार 221
15)-शंकर पिंगळे-6 हजार 732
16)-भिकोजी पाटील-38 हजार 755
17)-जयेश बोरा-56 हजार 956
18)-नानासाहेब आंबोले-1 हजार 24

Share: