मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर दुर्गंधीच्या छत्रेखाली, समितीच्या आवारात सडलेला भाजीपाला आणि फळांचा ढीग

9
0
Share:

आशिया खंडातील ओळखलया जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सध्या दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला भाजीपाला, फळांचे ढीग सडल्यामुळे तसेच पाणी सुद्धा साचले आहे. त्यामुळे मार्केट परिसरात ही दुर्गंधी सुटली आहे. समितीच्या आवारात सुटलेल्या दुर्गंधीच्या आणि पसरणाऱ्या रोगराईच्या मुद्यावर बाजार समिती आणि महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातुन अनेक शेतकरी, व्यापारी मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी येतात. येथे कांदा बटाटे, भाजीपाला, फळे यांची मोठ्या प्रणावर विक्री होते. मात्र सध्या या कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणे नकोसे झाले आहे. विकला न गेलेला माल तसेच खराब माल याचे ढीग बाजार समितीच्या परिसरातच टाकले जात आहेत. पावसाळ्यात खराब झालेला माल कचरा म्हणून टाकला जातो. याची विल्हेवाट न लावल्यामुळे या कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सुटली आहे. बाजारात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नाक दाबून खरेदी करावी लागत आहे. बाजार समिती परिसर असलेल्या प्रवेशद्वारासोरच कचऱ्याचे ढीग टाकले जातात. तरीदेखील समितीकडून कोणावरही कारवाई केली जात नाही. समितीच्या अंतर्गंत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, सार्वजनिक ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कोण लावणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. या परिसरात सरकारी कार्यालय तसेच अयात निर्यात करणाऱ्या कार्यालयाचे गोदामदेखील आहेत. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा कचरा रोज उचलण्याचे काम चालु आहे असे स्वच्छता विभागाचे अधिकारी एस.एन कटकधोडं यांचे म्हणने आहे . बाजारसमिती मध्ये रोज दिडशे टन कचरा उचलला जातो तर बाजार समिती परिसराची अशी अवस्था का हा प्रश्न व्यापारी तसेच ग्राहक वर्गामध्ये उभा राहत आहे.

कचऱ्याच्या संदर्भांत तक्रारी आल्यानंतर आम्ही या संदर्भांतील बैठक घेऊन कचरा उचलणारे आणि रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांना तंबी दिली आहे. कचरा योग्य वेळेत ठरवून दिलेल्या ठिकाणी टाकावा आणि योग्य वेळेत उचलावा, असे सांगितले आहे.

अनिल चौैहाण

सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

Share: