Mumbai Apmc Chairman election: आमची स्पर्धा शेतकऱ्यांशी नसून आतंरराष्ट्रीय कंपन्यांशी आहे; सर्व सचलकांनी मिळून पारित केला ठराव – आमदार शशिकांत शिंदे

6
0
Share:
तृषा वायकर,ऐपीएमसी न्युज
नवी मुंबई :कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 5 महिने लांबणीवर पडली होती. अखेर या निवडणुकीसाठी मुहूर्त सापडला असून आज सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी ही निवडणूक पार पडली.
मराठावाडा महसूल विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गोविंदराव डक यांना विनविरोध सभापती पदासाठी  निवडून देण्यात आले आहे. तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांना मुंबई एपीमसीच्या उपसभापती पदासाठी विनविरोध निवडून देण्यात आले आहे.
बाजारसमिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला.भाजपने अनेक प्रयत्न केले.परंतु त्याठिकाणी त्यांना यश आले नाही.सभापती,उपसभापतीची निवड ही महाविकास आघाडीसाठी ऐकतेचं दर्शन आहे.
पहिला जो संघर्ष आहे, तो केंद्राने पारित केलेल्या एका आदेशाबद्दलचा आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला सूट मिळावी म्हणून हा आदेश पारित केला आहे. पूर्वीपासून शेतकऱ्याच्या मालाला कोणतीही नियमावली नाही. मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकरी,माथाडी कामगार यांना न्याय मिळायचा असं शिंदे यावेळी म्हणाले.बोरीवली, कुर्ला अनेक ठिकाणी बेकायदेशीर व्यापार चालू आहे जो शेतकऱ्याचा नावाखाली चालू आहे. यावर लढाई चालू आहे. केंद्राने आदेश काढला या आदेशाच्या संदर्भात एक नोटिशन काढलं आहे. आमचा विरोध त्यालाच आहे.
सरकारने सहकार संपवण्याच्या प्रयत्न चालू केला आहे. यामध्ये बँका, बाजार समित्या या शेतकऱ्यांशी रिलेटेड आहेत. आमची लढाई  शेतकऱ्यांच्या विरोधात नसेल तर ती आमच्याशी स्पर्धा करणाऱ्या मोठ्या आतंरराष्ट्रीय  कंपन्याशी  असेल. या पद्धतीचा ठराव सगळया संचालकांनी मिळून पारीत केला आहे. या बाजारसमितीचे आव्हान असणार आहे की,पूर्वी  बाजारसमिती  ज्यापद्धतीने  होती तशी करावी लागेल. आम्ही शेतकऱ्यांना प्राधान्य देऊ. व्यापाऱ्यांशी समनव्य साधून मोडकळीस आलेल्या इमारती ज्या आहेत त्याची पुनर्बांधणी करण्याचा संदर्भात निर्णय नवीन मंडळांनी घेतला. अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली. 
दरम्यान, पूर्ण राज्य आणि देश कोविडच्या महामारीने ग्रासलेला असताना या कठीण प्रसंगी आमची निवड झाली. तरी आम्ही शेतकऱ्याचं हीत व्यापाऱ्यांमधील समन्वय या दोघांमधील दुवा म्हणून या कठीण प्रसंगी जास्तीत जास्त चांगलं काम कसं करता येईल याला प्राधान्य देऊ.
सर्व संचालक मंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांना एक सविस्तर निवेदन दिलं. महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे आम्हाला जाचक कायद्यावर परिणामकारक उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे.
एपीएमसी मार्केटमधील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करून हे प्रश्न निकाली लावू. तसेच धोकादायक असलेल्या इमारती संदर्भात व्यापाऱ्यांशी समन्वय साधून पुनर्बांधणी करण्याच्या संदर्भात निर्णय नवीन मंडळ घेईल. अशी प्रतिक्रिया मुंबई कृषी उपन्न बाजार समिती सभापती अशोक डक यांनी दिली.
Share: