केंद्र सरकारने पारित केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबतच्या विधेयकांना मुंबई एपीएमसी सभापतीने केला विरोध

18
0
Share:

नवी मुंबई:   केंद्र सरकारने पारित केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबतच्या तीन विधेयकांना लोकसभेत मंजुरी देण्यात आली. यामुळे गेली कित्येक वर्षे शेतकरी आणि शेतकरी संघटनांची बाजार स्वातंत्र्याची मागणी पूर्ण झाली आहे. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीत काही शेतकऱ्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. जर हमीभावापेक्षा दर वाढला आणि यामध्ये सरकारने जर हस्तक्षेप केला तर या विधेयकाला काहीच अर्थ उरणार नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते व काही अभ्यासकांनी दिली आहे.

मुंबई एपीएमसी सभापती अशोक डक यांनी सांगितले की, नियमनमुक्ती नाही झाली पाहिजे. जर नियमनमुक्ती झाली तर मार्केट पूर्णपणे संपेल. याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे आम्ही ही नियममुक्ती महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही. अशी प्रतिक्रिया सभापती अशोक डक यांनी दिली. मात्र, दुसरीकडे मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

Share: