Mumbai Apmc:भाजीपाला व फळ मार्केटची स्वच्छतेची ऐसीतैशी

23
0
Share:

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे भाजीपाला व फळ मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे भाजीपाला व फळ मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे एपीएमसी प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

एशिया खंडातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 700 ते 800 भाजीपाळाचे गाड्याची आवक होत आहे ,या मार्केट परिसर स्वच्छ ठेवणासाठी स्वच्छता अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे . स्वच्छतेचे नावाखाली बाजारसमितीकडून कोट्यवधी रुपये रुपये खर्च केला जातो पण मार्केट परिसरात सध्या दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला भाजीपाला, फळांचे ढीग सडल्यामुळे ही दुर्गंधी सुटली आहे. समितीच्या कार्यालया लागत सुटलेल्या दुर्गंधीतून सुटका करण्याच्या प्रयत्नाकडे समिती कडून दुर्लक्ष होत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बटाटा, भाजीपाला, फळे, मसाला आणि दाणा मार्केट अशी पाच मार्केट आहेत.

या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल अडत्यामार्फत किरकोळ व्यापाऱ्यांना विकला जातो. अनेक शेतकरी, व्यापारी मालाची खरेदी-विक्री करतात. येथे कांदा बटाटे, भाजीपाला, फळे विकली जातात. मात्र सध्या या बाजार समितीत जाणे नकोसे झाले आहे. विकल्या न गेलेल्या मालाचे ढीग बाजार समितीच्या लागत असलेल्या रस्त्यावर टाकले जात आहेत. याची विल्हेवाट न लावल्यामुळे या कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सुटली आहे.

बाजारात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नाक दाबून खरेदी करावी लागत आहे. भाजीपाला मार्केट समितीचे कार्यालय असलेल्या प्रवेशद्वारासोरच कचऱ्याचे ढीग टाकले जातात. तरीदेखील समितीकडून कोणावरही कारवाई केली जात नाही.मार्केट मध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांन कायम या सडलेल्या कचऱ्याचा दुर्गंध सहन करावा लागतो.

बाजार समिती प्रशासनाने मार्केट परिसरात कचऱ्याची मोठ्या कुंड्या ठेवले पाहीचे ज्यामुळे ज्यामुळे मार्केट परिसर स्वच्छ राहील.
कैलाश तांजने
भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष

कचऱ्याच्या संदर्भांत तक्रारी आल्यानंतर आम्ही या संदर्भांतील बैठक घेतो कचरा उचलणारे आणि रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांना तंबी दिली आहे. कचरा योग्य वेळेत ठरवून दिलेल्या ठिकाणी टाकावा आणि योग्य वेळेत उचलावा, असे सांगितले आहे.

सतीश सोनी

प्रशासक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

Share: