मुंबई एपीएमसी दानामार्केट मध्ये काँक्रेटच्या रस्त्यावर केलेल्या डांबरीकरण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न , ‘ग्रोमा’ कडून अजब फतवा.

9
0
Share:

रस्त्याचा दर्जापेक्षा मला किती मिळाले, हा नियम लावला गेल्याने एपीएमसीत सर्वच रस्त्यांची वाट लागली.

नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दाना मार्केट मध्ये हा प्रकार घडला आहे. तिथल्या व्यापार भवन समोर चार वर्षांपूर्वी रस्त्याचे काँक्रेटीकरण करण्यात आले होते. या रस्त्याच्या डागडुजी चे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र या काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरनाचे काम केले आहे । व्यापार भवन आणि जे विंग मध्ये असलेल्या काही रस्त्यावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे.


दरम्यान हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न ग्रोमाचे काही पदाधिकारी व एपीएमसी प्रशासनाकडून सुरु आहे.घडलेला प्रकाराची वाच्यता पत्रकार अथवा इतर कुठे न करण्याचा फतवा ग्रोमाने व्यापाऱ्यांवर काढला आहे . एपीएमसी दाना मार्केटमध्ये असलेल्या अभियंता कडून चुकीची माहिती देउन प्रशासनला दिशाभूल करण्यात येत आहे . सूत्राने सांगितले प्रमाणे हा घोटाळा ग्रोमाच्या आगामी निवडणुकींशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे.

बाजारातील या रस्त्याच्या काँक्रीटीकरण चे काम मंजूर झाले असताना आणि प्रत्यक्षात मात्र डांबरीकरण केले जात असल्याचे समोर आले आहे। टेंडर मध्ये आणि प्रत्यक्ष संपूर्ण कामामध्ये फार मोठी तफावत जाणवत आहे .(आरसीसी गटाराचे अर्धवट बांधकाम ,कमी जाडीचे डांबरीकरण, कमी प्रमाणात डामर वापर,नकाशे प्रमाणे काम नाही,खोदकाम न करता डांबरीकरण करण्यात आली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचणार).
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दाना मार्केट व मसाला मार्केट मध्ये काँक्रीट, डांबरीकरण व गटारांची कामा साठी 19 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे, दाना मार्केट आणि मसाला मार्केट मध्ये व्यापारी,माथाडी कामगार व ट्रान्सपोर्टला मूलभूत सुविधा देण्यासाठी बाजार समितीतर्फे रस्त्याचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण व गटारांची काम सुरू आहे. परंतु व्यापार भवनच्या समोर असलेल्या सिमेंट काँक्रीतिच्या रस्त्यावर डांबर टाकण्यात आली आहे .

या एका मार्केट मध्ये असे प्रकारे काम झाले असून अश्याच प्रकारे काम इतर ठिकणी झाले असल्याचे सांगते येत नाही या प्रकरणी कामाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर बाजार समिती कारवाई व्हावी अशे व्यापाऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे .दोन्ही मार्केट मध्ये बारा महिने झाले तरी सुद्धा 30 टक्के काम पूर्ण झाली नाहीत या मध्ये असे दिसून येत आहे कि या रस्त्यावर होणारा खर्च हा उघड उघड भ्रष्टाचार आहे. हे काम फक्त भ्रष्टाचारासाठी केले जात आहे या गोष्टी मध्ये बाजार समिती प्रशासन का लक्ष घालत नाही यावर ही व्यापाऱ्यांनी प्रश उपस्थित केला आहे । आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पांच मार्केट आहे या मध्ये मसाला मार्केट व दाना मार्केट आहे .मार्केट मध्ये काही वर्षांपासून रस्ते ,गटर आणि विविध प्रकारच्या समस्यावर व्यापाऱ्या कडून बाजार समितीला तक्रार केली जात होती.त्यामुळे बाजार समितीतर्फे दोन्ही मार्केटची काँक्रीटीकरण, डांबर व गटारांची काम करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या.पण दोन्ही मार्केटची टेंडर बी जे सिव्हिल वर्क या ठेकेदाराला देण्यात आले आहे. काम सुरू होउन बारा महिने होत आले मात्र अजून पर्यंत चार ते पाच विंग मध्ये काम झालेली आहेत मुख्य काम अजूनही बाकी आहे। रस्त्याच्या काँक्रीटी करणाचे काम अजूनही सुरू झालेले नाही।त्याच बरोबर गटारांची व इतरकामे झालेली नाही. डांबरीकरणाचे काम हे टेंडर मध्ये दाखवले जाते एक आणि प्रत्यक्षात मात्र वेगळेच काम केले जाते टेंडर मध्ये आणि प्रत्यक्ष कामामध्ये फार मोठी तफावत जाणवत आहे ।
वाहतुकीनची वर्दळ असल्यामुळे हे काम लवकरच खराब होऊन ह्या वर जागजागि खड्डे पडणार मग तोच कंत्राटदार हे खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा पैशांचा खर्च करणार अशी ही पद्धत असल्याने बाजारातील रस्ते निकृष्ट दर्जाचे बनवले जातात आणि लवकर खराब होतात ही या ठिकणी काम करण्याची पद्धत आहे असे ही काही व्यापरियानी सांगितले।सूत्रांनी सांगितले प्रमाणे दोन महिन्यात ग्रोमाची निवडणूक असल्याने कॉमिटी मध्ये असणाऱ्या प्रतिनिधीला कामाचा उत्तर द्यावे लागणार असल्याने हलका प्रतीच्या डांबरी रस्ते तयार करून व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यात काम सुरू आहे. त्यामुळे दाना मार्केट मध्ये काम पाहणाऱ्या कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारला वाचबिण्यासाठी ग्रोमाने फतवा काढला आहे.

यासबंधीत एपीएमसीचे प्रशासक सतीश सोनी यांनी सांगितले कि सदर कामाची चौकशी करण्यात येईल मुख्य अभियंता सात दिवस सुट्टीवर आहे आल्यानंतर जे कोणी या काम मध्ये चुकी केली असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल त्यामुळे यावर कोणता निर्णय घेतला जाईल यावर व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे।

Share: