FSI घोटाळ्या मधील माजी संचालकांनी  वाजत गाजत  भरला उमेदवारी अर्ज.

24
0
Share:

-FSI घोटाळ्या मधील माजी संचालकांनी  वाजत गाजत  भरला उमेदवारी अर्ज.

मंगळवारीपर्यंत ३७६ अर्जाची वाटप करण्यात आली असून १८१ उमेदवार अर्ज भरले आहेत.

नवी मुंबई:मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक उच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार पार पाडत आहे त्यानुसार दिनांक २४ जानेवारी ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सहा महसूल विभागातून निवडून येणाऱ्या १२ शेतकरी प्रतिनिधी,बाजार समितीच्या पाच बाजारा आवारातून ५ व्यापारी प्रतिनिधी , माथाडी व मापाडी या घटकातून एक प्रतिनिधी निवडणूक साठी संबंधित घटका कडून मंगळवारीपर्यंत ३७६ अर्जाची वाटप करण्यात आली असून १८१ उमेदवार अर्ज भरले आहेत. त्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी पैकी बाळासाहेब सोळसकर(माजी सभापती),कांदा बटाटा मार्केटचे माजी संचालक अशोक वाळुंज ,भाजीपाळाची माजी संचालक शंकर पिंगळे,फळ बाजारातून संजय पानसरे ,मसाला मार्केट मधून कीर्ती राणा यांनी उमेदवारी अर्ज बाजारसमितीच्या मुख्यलयाततील निवडणूक कार्यालयात ढोल तासाच्या गजरात दाखल झाले ,फार्म दाखल करताना तो बैध ठरावा या साठी कोणत्याही उमेदवाराकडे बाजार समितीची थकीत रकम नसावी हे बंधनकारक आहे म्हणून माजी सभापती बाळासाहेब सोलासकरकडे समितीची थकीत असलेली दहा लाख रुपये भरणा केली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याची नजर पुन्हा सभापतींच्या खुर्चीकडे असल्याचे दिसून येत आहे . तसेच कांदा बटाटा बाजाराचे माजी संचालक अशोक वाळुंज यांनी सुद्धा थकीत रक्कमेचा भरणाकरून उमेदवारी अर्ज दाखल केला,भाजीपालाची माजी संचालक शंकर पिंगळे,फळ बाजारात माजी संचालक संजय पानसरे,मसाला मार्केटचे माजी संचालक कीर्ती राणा यांनी थकीत रक्कम भरून वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला.मात्र 2014 साली उच्च न्यायालयात दाखल असलेल्या १३८ कोटी FSI घोटाळ्यामध्ये माजी सभापती व संचालकांच्या नावाचा समावेश होता त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे १३८ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, सदर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. या घोटाळ्यामधील नाव असणाऱ्या माजी संचालक परत निवडणूक लढत आहे अशी चर्चा बाजार आवारात होत आहे शेवटी शेतकऱ्यांचे हित कोणाकडून जोपासले जाईल याची मतदार राजा चाचपणी करून उमेदवार निवडला जाईल.सध्या स्थितीत निवडणूक प्रक्रिया चालू असलेल्याने भविष्य वर्तबीने घाईचे ठरेल.सध्या बाजार समितीमध्ये निवडणूक वातावरण सुरू झाली आहे त्याच बरोबर माथाडी व मापडी कामगारांच्या वतीने माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत  शिंदे यांना पाठिंबा दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची जास्त शक्यता आहे.
भाजप सरकारच्या काळात भाजीपाळा मार्केटच्या माजी संचालक व आता निवडणूक मध्ये संचालक पदावर उभे राहणारे शंकर पिंगळे यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची जवळीक वाढली होती . राज्य सरकार स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहिल्याने बाजार समिती मध्ये तसेच भाजीपाला मार्केट मध्ये सुरुवाती पासून वर्चस्व ठेवणारे एनसीपीच्या बरोबर कांग्रेस व शिवसेना एकत्र असल्याने महाविकास आघाडीचे वर्चस्व वाढले आहे. शंकर पिंगळे यांच्या समोर के. डी मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने सध्या कांट्याची टक्कर होणार आहे त्याच बरोबर नवी मुंबई राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी मोरे यांना पाठिंबा दिल्यामुळे बाजार समिती मध्ये सध्या मोरे यांचे वजन वाढले आहे. फळ बाजारात एकमताने संजय पानसरे यांना पाठिंबा दिला गेल्याने ते आपला उमेदवारी अर्ज भरले त्यासाठी या बाजारातील सर्व संघटनांची एक बैठक होऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कांदा बटाटा बाजारात माजी संचालक अशोक वाळुंज यांना राजेंद्र शेळके हे टक्कर देण्याची शक्यता आहे. सहा महसुली विभागांतून बारा शेतकरी संचालक म्हणून निवडून येणार असून यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हा नेते या निवडणुकीत उतरणार आहेत. पाच संचालक हे राखीव संवर्गातून राज्य शासनाकडून नियुक्त केले जाणार असून दोन संचालक हे मुंबई व नवी मुंबई पालिकेमधून नियुक्त होणार आहेत. पुढील महिनाभर राज्यातील या बाजार समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

१८१ उमेदवार अर्ज दाखल

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवणुकीसाठी १८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २४ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३७६ अर्जाचे वाटप करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी मतदान चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.

Share: