मुंबई एपीएमसीतील फळ आणि भाजीपाला बाजारात चोरीच्या घटनांमध्ये वाढ,मोबाईल व गाळे धारकांच्या तिजोरीवर चोरट्यांचा डल्ला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

21
0
Share:

फळ आणि भाजीपाला बाजारात चोरीच्या घटनांमध्ये वाढ,मोबाईल व गाळे धारकांच्या तिजोरीवर चोरट्यांचा डल्ला
सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

नवी मुंबई: मुंबई बाजारसमितीच्या फळ आणि भाजीपाला बाजारात पैश्यांसह मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.व्यापाऱ्यांचा उरलेला शेतमाल ही चोरीला जात असल्यासाचे प्रकार घडत आहेत.बाजारसमितीची सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरत आहे.अनेकदा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.चोरीच्या वाढत्या घटनांमुळे हमालांसह व्यापाऱ्यांनाही धास्ती भरली आहे.डळमळीत सुरक्षा व्यवस्थेचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहेत.सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

तुर्भे येथील कृषी उत्पन्न समिती येथील बाजारपेठेत परराज्यातून मोठ्या प्रमाणात फळ व भाजीपाल्याची आवक होते.त्यांमुळे येथे व्यापारी,शेतकरी,गाड्यांचे मालक-चालकांसह वाहकांची ची ये-जा मोठ्या प्रमाणात असते.यासोबत ग्राहकांची ही संख्या मोठ्या प्रमाणात असते.येथील गाळेधारक व्यापाऱ्यांना वर पोटमाळ्याची व्यवस्था केलेली आहे.या ठिकाणी व्यापाऱ्यांचे पैसे ,उरलेला माल ठेवण्यात येतो.या मालासह पैसे चोरीला जात आहेत.मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये ही वाढ होत आहे.येथील गाळ्यांच्या मोकळ्या जागेत रात्री हमाल झोपतात.त्यांचे मोबाइलला ही चोरीला जात आहेत.पोटमाळ्यांच्या दरवाजे, तिजोरी तोडून पैसे लंपास केले जात आहेत.बाहेरून येणाऱ्या गाडीवाल्यांचे ही मोबाइलला चोरीला जात आहेत.या मंगळवारी भाजीपाला बाजाराच्या इ विभागात अशीच चोरीची घटना घडली.बाजारसमितीत रोज येणाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करणे आवश्यक आहेत.माल आल्यावर प्रत्येक गाडीचा परवाना व कोड ची चाचपणी केली जात नाही.चिरीमिरी देऊन वाहनचालकांना प्रवेश देण्यात येतो असे नितिन वाळुंज या व्यापाऱ्याने सांगितले.

ओळखपत्र देण्याविषयी कार्यवाही सुरू केली आहे.हे किती प्रमाणात यशस्वी होते या विषयी खात्री नाही कारण शेकडो वाहनचालक येतात प्रत्येकाला ओळखपत्र देणे शक्य नाही.सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

प्रज्ञा तायडे,उपसचिव भाजीपाला बाजार समिती

Share: