मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये अनधिकृतपणे कांदा बटाटा व लासूनचा व्यापार करणाऱ्या 17 व्यापाऱ्यांवर कारवाई, 13 हजार 500 रुपये दंड वसुली.

26
0
Share:

नवी मुंबई: मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपालाच्या नावाने अनधिकृतपणे कांदा बटाटा  व्यापार करणाऱ्या 17 व्यापाऱ्यांवर एपीएमसी प्रशासनाने कारवाई केली आहे.

भाजीपाला मार्केटमध्ये कांदा बटाटा व लसुनचा व्यापार करणाऱ्या 17 व्यापाऱ्यांकडून 13 हजार 500 दंड वसुली करण्यात आली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये कांदा बटाट्याचा व्यापार कशासाठी करत होते? यावर 7 दिवसात खुलासा करा. नाही तर तुमचा परवाना रद्द केला जाईल असे आदेश उप सचिव यांनी दिले असुन यावर नोटीस काढण्यात आली आहे.

भाजीपाला मार्केटच्या गेटवर तरकारी सांगून आत कांदा बटाटा व लसून घेऊन प्रवेश देणाऱ्या त्या एपीएमसी कर्मचारीवर सुद्धा कारवाई करण्यासाठी प्रशासन तयारी केला आहे. सध्या एपीएमसी प्रशासनाकडून  सांगण्यात आले आहे की, ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनीच व्यवसाय करावा. तरकारीच्या नावाने कांदा बटाटा विकणाऱ्या 17 व्यापाऱ्यांवर एपीएमसी प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे या अनधिकृत व्यापार करण्यासाठी अभय देणाऱ्या काही कर्मचाऱ्यावर पण लवकर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूत्राने दिली आहे.

Share: