मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारातील बेकायदा विक्रेत्यांमुळे अपघाताची शक्यता,माल वाहतुकीची समस्या गंभीर

6
0
Share:

नवी मुंबई:खाद्यपदार्थ विक्रेते,अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्या व्यापारी, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांमुळे चौकाचा ‘श्‍वास’ पुरता गुदमरून गेला आहे, भाजीपाला मार्केटच्या चारही दिशांकडील रस्त्यांवर आणि पॅसेजमध्ये अतिक्रमण केले आहे ज्यामुळे वाहेरून येणाऱ्या भाजीपाल्याची गाड्या उशीर होत आहे आणि शेतकऱ्यांना भाव मिळत नाही ज्या मूळे नगर मधून आलेल्या एका शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे .

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला घाऊक बाजारात गाळ्याच्या बाहेरील मालाची चढ-उतार करण्याच्या जागेत गाळे मालक राजरोजसपणे मालाच्या विक्रीसाठी अनधिकृतपणे बस्तान मांडून बसत आहेत.सकाळच्या वेळी येथे व्यापाऱ्यांची माल विक्रीसाठी चढाओढ लागते.याशिवाय चहा खाद्यपदार्थ विक्रते ही यात आणखी भर टाकत आहे.ग्राहकांना चालण्यासाठी जागा शिल्लक नाही.त्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत.मालवाहतूकीचाही प्रश्नही डोके वर काढत आहे.ग्राहकांनासहित माथाडी कामगार व मजूर यांना मार्ग काढत जावे लागत आहे.बाजार समिती याकडे डोळेझाक करत आहे.या विक्रेत्यावर कारवाईची मागणी होत आहे.

तुर्भे येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.येथील भाजीपाला बाजारासाठी ए, सी,डी आणि इ असे विभाग नेमून देण्यात आले आहेत.ए व इ हे विभाग घाऊक बाजारासाठी तर सी व डी हे किरकोळ व्यापारासाठी वापरले जात आहे.येथील ए विभागातील गाळाधारक सकाळच्या वेळी मालाची चढ -उतार करण्यासाठी असलेल्या जागेत माल ठेवत आहेत तर डी विभागातील गाळाधारक या जागेत माल विक्री करत आहेत.मालाच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांची चढाओढ लागत आहे.एका गाळ्यात सहा ते सात जण व्यापार करत आहेत.चहा ,खाद्यपदार्थ विक्रेत्यांचाही त्यात समावेश असतो.ग्राहकांना चालायला जागा शिल्लक राहत नाही.त्यामुळे पडझडीच्या घटना घडत आहेत.मजुरांना डोक्यावर माल घेऊन चालायला जागा शिल्लक नसल्याचे शिवाजी जाधव या माथाडी कामगाराने सांगितले.
रोज येथे हजारोच्या संख्येने गाड्यांची ये-जा होत असते.येथील रस्त्यांवर माल विक्री करून रिकामे कॅरेट ठेवले जात आहे.रस्त्यावर कॅरेटच्या थप्पी लागत आहेत.ट्रक चालकांना गाड्या वळवण्यासाठी ही त्रास होत आहे.भाजीपाला बाजाराच्या चारही बाजूनी व्यापारी व खाद्यपदार्थ विक्रेते यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुक कोंडी ची समस्या येथे निर्माण होत आहे.बाजारसमिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.सुरक्षा रक्षक आणि बाजार समिती अधिकारी यांच्या संगनमताने हा भोंगळ कारभार चालत असल्यासाची तक्रार केली जात आहे.ग्राहकांना ती जागा मोकळी करून देण्याची मागणी जोर खात आहे.

याबाबत सुरक्षा रक्षकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.मालवाहतूक सुरळीत करण्यासाठी च्या सूचना ही देण्यात आलेल्या आहेत.खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे परवाने आहेत तरी त्यांचे परवाने पुन्हा तपासले जातील.
प्रज्ञा तायडे,उपसचिव कृषी उत्पन्न बाजारसमिती.

Share: