कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुबई एपीएमसी सज्ज.

4
0
Share:

बाजार आवारात स्वच्छता साठी व्यापारी व एपीएमसी प्रशासन तर्फे  एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

-मुंबई एपीएमसीती मधील कोरोनाचा धोका लक्षात घेता मोठा निर्णय घेण्यात आला .

-पुढील दोन दिवस म्हणजेच गुरुवार आणि रविवारी 31 मार्च पर्यंत एपीएमसी बंद राहणार .

नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेतील बाजारात राज्यातून दररोज हजारो नागरिक,व्यापारिवर्गाचे ये जा असते.त्यातच आता कोरोना व्हायरस साथीने उच्छाद मांडला आहे.त्या साथीच्या मुकाबल्या साठी बाजारपेठेतील प्रशासन सज्ज झाले आहे.तसेच साहित्य विकण्यासाठी ऑन लाईन किंवा फोन वर ऑर्डर घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.यामागे गर्दी कमी होईल अशी माहिती मुबई एपीएमसी प्रशासक व सचिव अनिल चव्हाण यांनी दिले आहे.(Mumbai APMC ready to fight Corona.)

भाजीपाला व फळ मार्केट मध्ये बुधवारी रात्री 11 वाजल्यापासून गुरुवारी रात्री 11 वाजेपर्यंत व शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत व्यवसाय बंद करून बाजारपेठा स्वच्छ निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.तसेच कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी फोन वर ऑर्डर घ्यावी.जेणेकरून गर्दी होणार नाही असेही आदेश देण्यात आले आहेत.(Mumbai APMC ready to fight Corona.)

तसेच बाजारपेठेचा आवारात विविध प्रकारचे कोरोना विषाणू बाबत होर्डिंगस लावण्यात आला आहेत.यामध्ये आजाराची लक्षणे,माहिती,काय करावे काय करू नये,अश्या प्रकारचे होर्डिंग प्रसिद्ध करण्यात आला आहेत.तसेच बाजारपेठ स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी हेल्प लाईन 9821138677,8800999921 सुरू करण्यात आल्या आहेत.तसेच कोरोना विषयी आरोग्य माहिती साठीडॉ.अजय पाटील 9819686855 व एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण 8600999921 हे हेल्पलाईन क्रमांक ठेवण्यात आले आहेत.

बाजार आवारात महत्वाचे घटक असणारे आवक जावक गेटवरील कर्मचारी सुरक्षा रक्षक,माथाडी,मापाडी यांना कोरोना बाबत कशी काळजी घ्यायची म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.तसेच मार्केट मधील अडत्ये,व्यापारी यांच्या कर्मचाऱ्यांना मास्क,सनीटायझर्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

(Mumbai APMC ready to fight Corona.)

-भाजीपाला व फळ बाजारपेठेत कार्यरत असणाऱ्या विविध संघटनेच्या वतीने मीटिंग घेण्यात आली.उद्भवणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी व्युव्हरचना आखली गेली आहे.तसेच साहित्य विकण्यासाठी ऑन लाईन प्रणाली किंवा फोनद्वारे ऑर्डर घेण्याची विनंती व्यापाऱ्यांना केली गेली आहे.

अनिल चव्हाण,सचिव,एपीएमसी, मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती

Share: