मुंबई एपीएमसीचे टेक्निकल असिस्टंट नानासाहेब महाजन कोरोना मुळे मृत्यु,15 दिवसात 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

31
0
Share:
नवी मुंबई-मुबंई एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून  मसाला मार्केटमधील  टेक्निकल असिस्टंट नानासाहेब लक्ष्मण महाजन वय वर्षे 40 यांचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 15 दिवसात मसाला मार्केट व धान्य मार्केटमधील 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
नानासाहेब महाजन हे एपीएमसी मध्ये टेक्निकल असिस्टंट या पदावर रुजू होते. यांच्या  पश्च्यातघरी बायको, 7 वर्षाची मुलगी आहे. महाजन यांच्या अकाली जाण्यामुळे त्याच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाजन यांना न्यू पनवेल मधील रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. तिकडे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नेरुळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण त्यांना रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.दुसरीकडे एपीएमसी भाजीपला मार्केटचे अधिकारी म्हणतात भाजीपाला मार्केटमध्ये “कोरोना फिरोना नाही” आता तरी जागे व्हा .
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना विषाणू विरुद्ध देत असलेल्या लढ्यात विनायक कांबळे तसेच नारायण खंडागळे, व नानासाहेब महाजन यांनी आपल्या बहुमूल्य आयुष्याचा त्याग केला आहे. त्यांचे हे बलिदान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कधीही विसरणार नाही. त्यांच्या परिवाराच्या दुःखात संपूर्ण एपीएमसी परिवार सहभागी आहे. व यापुढे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी आपला सर्व एपीएमसी परिवार उभा राहील.
नवी मुंबईत कोरोना बधितांची संख्या 32 हजार पार झाली असून. आतापर्यंत 681 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 33 कंटेंटमेन्ट झोन आहे. यामध्ये तुर्भे देखील आहे. आता सध्या एपीएमसी चे भाजीपाला मार्केट सुरळीत करण्यात आले आहे. यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात रोज गर्दी होत आहे. यामुळे मार्केटमध्ये महापालिकेने अँटिजेंन टेस्ट सुरू करण्याची गरज आहे अशी माहिती व्यापाऱ्यानी दिली आहे.
Share: