मुंबई एपीएमसी भाजीपाला आणि फळ मार्केट सुरळीत सुरू तर मसाला,दाना आणि कांदा बटाटा मार्केट पूर्णपणे बंद

4
0
Share:
नवी मुंबई: प्रलंबित 16 मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी , ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे राज्यव्यापी लक्षणीय संप पुकारण्यात आला आहे तर दुसरी कडे मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये करोबार सुरू आहे ,आज भाजीपाला घाऊक बाजारात 600 गाड्याची आवक झाली आहे तर फळ मार्केट मध्ये 100 गाड्याची आवक झाली आहे या मध्ये असे दिसून येत आहे की माथाडी कामगार संघटनेने पुकारलेल्या बंदचा परिणाम एपीएमसीवर नाही. भाजीपाला मार्केट सुरळीत सुरू. माथाडी कामगार नेत्यांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे बंदचा परिणाम नसल्याची चर्चा बाजार आवारात होत आहे।
दुसरी कडे दाना मार्केट,कांदा बटाटा मार्केट व मसाला मार्केट पूर्णपणे बंद आहेत .या तिघे मार्केट मध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी सांगितले प्रमाणे आपल्यावर भेदभाव का? एकी कडे दोन्ही मार्केट सुरू तर आमचे मार्केट बंद का असे प्रतिक्रिया काही व्यापारी यांनी दिली.
माथाडी कामगारांना भेडसावत असलेल्या समस्यांबाबत राज्य शासनाच्या पणन,कामगार,गृह,नगरविकास व सहकार विभागाकडे  बरीच निवेदन दिली आहेत. मात्र निवेदने देऊन देखील राज्य शासनाने अजून ही  माथाडी कामगारांचे प्रश्न निकाली काढले नाहीत .त्यामुळे माथाडी कामगारांत असंतोष पसरला आहे.शिवाय सरकार, कामगार मंत्री व कामगार आयुक्तांच्या माध्यमातून माथाडी चळवळीला संपविण्याचा  प्रयत्न सुरू आहे असा आरोप माथाडी कामगार नेत्यांनी केला आहे. पूर्वी माथाडी कामगाराला 10 तारखेला त्याचे वेतन मिळतं असे, मात्र सद्यस्थितीत 15 ते 20 दिवस होऊनही वेतन माथाडी कामगारांच्या खात्यात येत नाही आहे.जुन्या संगणकिय  नोंदीत कमीत कमी राज्यभरातील 2 लाख माथाडी कामगारांचा पगार वेळेत निघत असे.मात्र सद्यस्थितीत व्यापारी वर्गाकडून वेळेत पैसे दिले जातात,व डेटा एन्ट्री ही वेळेत केली जाते मात्र ती सिस्टीम सचिवांच्या व कामगार मंत्र्यांच्या माध्यमातून जाणूनबुजुन बदलली जातं असल्याचा थेट आरोपही माथाडी नेत्यांनी केला आहे. तसेच सद्यस्थितीत नवीन सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करत नसल्यानेही वेतन वेळेवर मिळतं नाही आहे. तसेच कामगारांवर अतिरिक्त कामाचा भारही माथाडी कामगारांवरही येत आहे.याचबरोबर वारंवार मागणी करूनही इतर मागण्या पूर्ण होत नसल्याने
 कामगारांना  लाक्षणिक संपाशिवाय पर्याय नाही.त्यामुळे  आज सर्व माथाडी कामगार लाक्षणिक संपावर गेले आहेत. या संपात सहभागी होण्यासाठी  माथाडी कामगार,वारणार,मापाडी कर्मचारी, कार्यालयिन सेवेतील कर्मचारी,पालावाला महिला कामगार, मेहता कर्मचारी,व अन्य घटकांनी संपूर्ण दिवस आपले काम बंद ठेऊन  संपात सहभागी  होऊन हा संप यशस्वी करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी ,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले होते .मार्केट मध्ये पांच मार्केटतीळ तिघे पूर्णपणे बंद आहेत तर  फळ आणि भाजीपाला मार्केटला निवेदन देउन सुद्धा ते लोकांनी आपल्या व्यबसाय सुरू केलं आहे अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Share: