मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या कर्मचारी पगार घेतात Apmcचा काम करतात व्यापाऱ्यांचे ; तर महसूल वाढणार कसा?

20
0
Share:

नवी मुंबई: रात्रदिवस चालू असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला मार्केटमध्ये ना बाजार फी मिळतो ना मापड्याचा पगार दिला जातो; मार्केटचा कोट्यवधी रुपये शेष नक्की जातो तरी कुठे?


मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून येणारी बाजार फी जवळपास 2 कोटी तर तीन महिन्यापासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मापाड्याचा 1 कोटी 70 लाख रुपये पगार थकबाकी आहे. मार्केट सतत चालू असूनसुद्धा बाजार फी व मापाड्याचा पगार वसुली का होत नाही? यामुळे बाजार समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहरातील रुग्णनाच्या बरोबरच बाजार समिती मधून रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरूच आहेत. आत्ता पर्यंत अनेक व्यापार्यां बरोबर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली असून अनेक व्यापाऱ्यां बरोबर दोन कर्मचाऱ्यांना त्यात आपला जीव हि गमवावा लागला आहे. मात्र इतके होऊनही आत्ता हि बाजारात करोना संसर्ग वाढू न देण्याचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचेच बाजारातील परिस्थिती वरून दिसत आहे. बाजार आवारात मास्क न घालणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न राखणे, सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकणे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.


शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिके बरोबरच शहरवासीयांची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे भाजीपाला मार्केटचे उपसचिव म्हणतात की आता कोरोनाचा काळ संपला आहे. मार्केटमध्ये “कोरोना फिरोना काही नाही”
करोना संक्रमण सुरु होताना अगदी सुरुवाती च्या काळापासून भाजीपाला बाजारात होणारी गर्दी हि सर्वांच्या चर्चेचा विषय होती. यातून नियम कसे पायदळी तुडवले जात आहे हे वारंवार समोर आले आहे. त्यामुले अखेर बाजार समिती प्रशासनाने याकडे लक्ष घालून बाजारात कडक नियमांची अंमलबजावणी सुरु केली . बाजारात मास्क चा वापर ,सुरक्षित वावरच्या नियमाचे पालन, हे नियम सर्वाना घालून दिले. या शिवाय बाजारात प्रवेश दिला जाणार नसल्याचा फतवाच बाजार समितीने काढला होता त्यामुळे बाजारात एक शिस्त लागली होती. मात्र या महिन्यापासून पुन्हा बाजारात नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.


बाजारात सध्या व्यापारी कमी प्रमाणात येत आहेत मात्र त्यांच्याकडील कामगार इथे व्यवहार सांभाळत आहेत आणि या कामगारांकडून आणि खरेदीसाठी येणाऱ्या अनेक खरेदीदारांकडून करोना सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.आता बाजारात येणाऱ्या ची संख्या वाढली आहे. त्यामुले सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुले करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वाढली आहे.

सध्या भाजीपाला मार्केट रात्री 9 पासून दुसऱ्या दिवशी दुपारी 3 पर्यत मार्केट चालू ठेवले जाते. मार्केट आवारात रिकामी ट्रक आणि टेम्पो उभ्या केला जात आहे त्यामुळे साफसफाई मध्ये अडथळा निर्माण होत आहे आणि बाजार आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुपारी बाजारातील स्वच्छता आणि संध्यकाळी बाजारात माळ घेऊन येणाऱ्या गाड्यांची आवक असे बाजाराचे वेळापत्रक ठरले आहे. मात्र सध्या हे वेळापत्रक कुणीच पाळत नसून दुपारी हि बाजारात घाऊक व्यापार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व्यापार चालू झाल्याने बाजारात गर्दी वाढली आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या वेळापत्रक भाजीपाला मार्केटचे उपसचिव केराची टोपली दाखवत आहे.

मुंबई एपीएमसी सभापती अशोक डक यांनी सांगितले की बाजार आवारात मास्क न घालणे,सोशल डिस्टनसिंग पालन न करणे,बाजारात गुटका खाऊन थुकणार्यावर कारवाई केली जाईल आणि जे काही वेळापत्रक आहे त्यानुसार काम करण्यात होईल.

-अशोक डक,सभापती-मुंबई एपीएमसी

 

कोरोनाचे नियम तोडणाऱ्या लोकांमुळेच संसर्ग पसरण्यास हातभार लागत असल्याने अशा बेफिकिर नागरिकांवर कायद्याने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.

-अभिजित बांगर,आयुक्त- नवी मुंबई महापालिका

Share: