मुंबई APMC मध्ये असलेल्या निर्यात भवन बनले घाणीचे साम्राज्य

19
0
Share:
नवी मुंबई:नवी मुंबई महापालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सज्ज झाली आहे.शहर स्वच्छता संदेश देऊन रंगरांगोट्यांनी रंगवले जात  आहे दुसरीकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती मध्ये असलेल्या निर्यात भवन अपवाद ठरत आहेत.
बाजार समितीतर्फे 10 ते 15 दिवसापासून कचरा न उचल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होत आहे.परिसराला बकाल रूप आले आहे.दुर्गंधीचा सामना इथे असलेल्या एक्सपोर्टेर,  व्यापारी व कामगारांना करावा  लागत आहे.  स्वछताच्या नावाने कोट्यवधी रुपये बाजार समिती खर्च करतात पण ह्या निर्यात भवन मध्ये 10 दिवसापासून पडलेल्या कचरा कडे बाजारसमितीचे स्वच्छता अधिकारी  दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे नाराजी व्यक्त आहे.हा कचरा रोज शक्य तितक्या लवकर रोज उचलला जावा अशी मागणी होत आहे.
वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.शेतकऱ्यांच्या मालाला किमान दर मिळावे म्हणून या बाजारपेठेची निर्मिती केली आहे.त्यानुसार वेगवेगळ्या राज्यातून येथे भाजी व फळ मांगवला जातात आणि इथे पॅकिंग करून परदेशात पाठवला जातात .या निर्यात भवन मध्ये 15 ते 20 गाळे आहेत या मध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल येतात आणि प्रोसेसिंग करून वाहेर पाठवले जातात .  सडलेली फळे व भाज्या आवारात तसेच पडून राहत आहेत.त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे.दुर्गंधीमुळे नाकावर रुमाल ठेवून चालावे लागत आहे.भटक्या कुत्र्यांचा वावर ही त्यामुळे परिसरात वाढत आहे.हा कचरा लवकर उचलला जावा अशी मागणी निर्यातदार करत आहे.
Share: