‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’

95
0
Share:

नवी मुंबई : नवी मुंबईत आज 408 नवे रुग्ण सापडले अजून,आतापर्यतची एकुण रुग्णसंख्या 32,779 इतकी आहे.आतापर्यंत कोरोनावर 28,474 रुग्णांनी मात केली असून,आतापर्यंत 692 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.शहरात सर्वाधिक 93 रुग्ण नेरुळमध्ये आढळले आहेत,तसेच मुंबई एपीएमसी मार्केटच्या 3 कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम 15 सप्टेंबरपासून पूर्ण राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेची अंमलबजावणी नवी मुंबई महानगर कार्यक्षेत्रामध्ये करण्यात येणार आहे.ही मोहीम 2 टप्प्यामध्ये राबवण्यात आली आहे.15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर हा पहिला टप्पा व 14 ऑक्टोबर ते 24ऑक्टोबर हा दुसरा टप्पा.

या मोहिमेमागची जी भूमिका आहे ती राज्यशासनाने सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे.आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की राज्यशासन,महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यावतीने कोव्हीडच्या निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणावरती विविध कारवाया केल्या जात आहे.परंतु यामध्ये एक आयोजित स्वरूप असावं आणि पालिकेने कितीही प्रयत्न केला तरी जोपर्यत नागरिकांनी स्वतःकाळजी घेतली नाही,तोपर्यंत कोव्हीड पासून विजय मिळवता येणार नाही. त्या भूमिकेतून राज्यशासनाने या मोहिमेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोहिमे अंतर्गत पालिकेच्यावतीने 720 टीम तयार करत आहोत आणि या टीमच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण केलं जाईल आणि या माध्यमातून प्रत्येक घरातील कुटुंब संख्याचा तपास करण्यात येईल, त्यात तापाचा रुग्ण कोणी आहे का,त्यात कोणी सिनियर सिटीजन आहे का,याची पाहणी केली जाईल.

शासनाच्यावतीने मोबाईल अँप्लिकेशन देण्यात आलं आहे या अँप्लिकेशन वर नोंद केली जाईल आणि आयोजित पद्धतीने अंमलबजावणी होत असताना दोन टप्यामध्ये पाहणी करायची असल्यामुळे एक स्टिकर लावण्यात येईल जेणेकरून कोणत्या घरची पाहणी झाली आहे,हे ही कळण्यास सोपे जाईल.या मोहिमेच्या माध्यमातून 100 टक्के लोकसंख्येचा डेटा महानगरपालिकेकडे आल्यानंतर त्याद्वारे प्रत्येकाची चौकशी, कोव्हीडची माहिती इ. सांगण्यात येणार आहे,

अभिजीत बांगर -आयुक्त,नवी मुंबई महापालिका

Share: