नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

37
0
Share:

*आपण नक्की जिंकू, आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

नागपूर : नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही, असे त्यांनी सांगितले आहे. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्वटमध्ये म्हटलं आहे. (Tukaram Mundhe Corona positive)

माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोणतीही लक्षण नाही. मी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं आहे. दरम्यान गेल्या 14 दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच नागपुरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी मी घरातून काम करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Share: