मुंबई एपीएमसी फळ बाजारात नागपुरी संत्रीचा हंगाम लांबणीवर,गुजरातच्या संत्रीची चलती

9
0
Share:

रेश्मा निवडूंगे

नवी मुंबई: अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानाचा परिणाम यंदा संत्रीच्या हंगामावर ही झाला आहे.त्यामुळे नागपुरी संत्री चा हंगाम लांबणीवर पडला आहे.आणखी पंधरा दिवसांनी नागपुरी संत्रीची आवक होणार आहे.

संत्रीचे दुसरे नाव म्हणजे नारंगी.संत्रामध्ये जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात.संत्रामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.त्यामुळे ते लोक आवडीने खातात.यंदा अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामान यामुळे नागपुरी संत्रीच्या उत्पन्नात घट झाली आहे.त्यामुळे सध्या बाजारात राजस्थानी संत्रीची चलती आहे.त्यामुळे पंधरा दिवसांनी संत्री ची आवक वाढणार असल्याचे संत्रीचे व्यापारी अनवर खान यांनी सांगितले.याशिवाय पंजाबवरून येणाऱ्या किन्नू संत्री ही बाजारात उपलब्ध आहेत.या संत्र्या आकाराने मोठ्या व रंगाने गडद नारंगी असल्या तरी चवीला आंबट आहेत.त्यामुळे ग्राहकांची हव्या त्या प्रमाणात पसंती मिळत नाही.आकारावरून संत्री ची किंमत ठरत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.तुर्भे येथील घाऊक बाजारात रोज आठ गाड्यांची आवक होत आहे.यांचा आठ डझन चा दर १५० रु आणि मोठ्या आकाराच्या संत्र्यांचा दर १२०० रु आहे तर पंजाबी किन्नू संत्रीसाठी ६०० रु मोजावे लागत आहेत.किरकोळ बाजारात रु ग्राहकांना किंमत ६०रु प्रति किलो दरात उपलब्ध आहे.

Share: