माथाडी कामगार संघटनेत उभी फूट

7
0
Share:

नरेंद्र पाटील विरुद्ध शशिकांत शिंदे संघर्षाला सुरुवात

राज्यातील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून ओळख असलेल्या माथाडी कामगार संघटनेत आता उभी फूट पडली असून माथाडी नेते नरेंद्र पाटील विरूध्द शशिकांत शिंदे संघर्षाला सुरवात झाली आहे. नरेंद्र पाटील यांची गेल्या वर्षभरात भाजपाशी जवळीक वाढत गेल्यानंतर शशिंकात शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यात शितयुध्द सुरू होते . शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे आमदार असून माथाडी कामगार संघटनेने आतापर्यंत राष्ट्रवादीला साथ दिली होती.  मात्र माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी  भाजपाशी घरोबा केला. मराठा आंदोलनात सक्रीय असलेल्या नरेंद्र पाटील यांना भाजपाने  आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. काल कळंबोली येथे माथाडी कामगार मेळाव्यात शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका करीत हे  आहे. या वक्तव्यामुळे माथाडी कामगार संघटनेत फूट पडली आहे. मुख्यमंत्री यांनी माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न सोडविले असून शिंदे यांनी कामगारांच्या प्रश्नासाठी कधीच पाठपुरावा केला नसल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला ते पुढे आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, गेल्या मागची १५ वर्षे आघाडीची सत्ता होती परंतु त्यांनी इतकी वर्षे माथाडी कामगारांचे प्रश्न न सोडवता ते राखडवून ठेवण्याचं काम या आघाडी सरकाने केलं आणि फक्त निवडणुकांच्या वेळेला यांना माथाडी कामगारांच्या मतांची आठवण येते म्हणून हे राजकारण करतात.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांच्या उनत्तीसाठी नेहमी काम केलं आहे वडाळ्याचा माथाडी कामगारांच्या हक्काच्या घराचं देखील प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवला आहे. लोकांनी ओळखावं की कोण काम करतंय आणि कोण काम करत नाही आहे म्हणून त्यामुळे आता लोकांनीच संघटनेतील गद्दारांना शोधून काढा असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय.

Share: