नवी मुंबई बाजारपेठेत पुण्याच्या कांद्यावर भिस्त, कांद्याचे दर घसरल्याने नाशिकच्या कांद्याची आवक बंद.

21
0
Share:

*नवी मुंबई बाजारपेठेत पुण्याच्या कांद्यावर भिस्त*
*कांद्याचे दर घसरल्याने नाशिकच्या कांद्याची आवक बंद..

नवी मुंबई: गेल्या कित्येक दिवसापासून नवी मुंबई बाजारपेठेत कांद्याचे दर कडकडले आहेत.त्यामुळे सढळ हस्ते वाढला जाणारा कांदा हा सर्वसामान्याच्या थाळीत आता महागला आहे. कांद्याचे भाव कडाडल्याने शासनाने निर्यात बंदी केली आहे मात्र जास्त दर मिळत नसल्याने नाशिकच्या कांद्याची आवक चांगलीच घटली आहे त्यामुळे मुंबई नवीमुंबई परिसरातील भिस्त आता पुण्याच्या कांद्यावर आहे.
होलसेल बाजारात कांदा २८ ते ३२ रुपये दराने विकला जात विकला जात असून किरकोळ बाजारपेठेत ४० ते ४५रुपये इतका दर किलोमागे ग्राहकांना मोजावा लागत आहे. सद्य स्थितीत नवी मुंबई व मुंबईपरिसरात प्रतिदिन १६००टन कांद्याची गरज आहे मात्र आज फक्त नवी मुंबई बाजारपेठेत ७४२ टन कांद्याची आवक झाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातुन नवी मुंबई बाजारपेठेत कांद्याची आवक होत असते. मात्र नाशिकच्या स्थानिक बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव मिळतं असल्याने शेतकरी मुंबईत आपला कांदा पाठवीत नसल्याचे कांदा बटाटा अडत व्यापारी संघाचे सेक्रेटरी सुरेश शिंदे यांनी सांगितले आहे. पुण्यातील कांदा परवडण्याजोगा असून त्यांचा दर्जाही चांगला असल्याने पुण्याच्या कांद्याला पसंती मिळतं आहे.

Share: