देशी कांदा परदेशी कांद्यावर भारी.

4
0
Share:

नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात वाढ झाल्याने सर्वत्र कांद्याचीच चर्चा सुरु आहे . कांद्याचे वाढते भाव कमी करण्यासाठी सरकारने परदेशातून कांद्याची आयात करण्यास सुरुवात केली. मात्र, सध्या देशी कांदा परदेशी कांद्यावर भारी पडत असल्याचं दिसून येत आहे . परदेशातून आयात केलेल्य़ा कांद्याच्या तुलनेत देशी कांद्याला अधिक भाव मिळत असल्याचं चित्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे .

अवकाळी पावसाच्या तडाख्यात कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आणि कांद्याचे भाव गगनाला भिडले. कांद्याच्या वाढत्या भावामुळे सरकार चिंताजनक आल्याचं दिसून आलं.  दोन महिने झाली  सरकारने  इजिप्त, थायलँड,तुर्कीतुन कांदा आयात करण्यास सुरुवात केली. परदेशातून कांद्याची आयात केल्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे. मात्र, तरीही सरकार कडून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात होत आहे.

सरकार परदेशातील कांद्याची आयात करत असली, तरीही लोकांची पसंती ही देशी कांद्यांनाच आहे. त्यामुळेच तुर्की,थायलँड,इजिप्त आणि अफगाणिस्चानपेक्षा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथील कांद्याला उच्चांकी भाव मिळतो आहे. वाशी एपीएमसीमध्ये इजिप्त, तुर्कीस्च्या कांद्याला 8 हजार ते 9 हााजर रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तर देशी कांद्याला तब्बल 10 हजार पासून 13 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रतील शेतकऱ्यांनमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

परदेशातून आलेल्या कांद्यापेक्षा भारतातील कांदा हा उच्च प्रतीचा आहे. त्यामुळे आपल्या देशी कांद्याला चांगला भाव मिळतो आहे. हा कांदा खाण्यासाठी देखील चविष्ट असतो, त्यामुळे या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते अशी माहिती वाशी एपीएमसीतील व्यापारी सुरेश शिंदे यांनी दिली आहे

सरकारने परदेशातून कांदा आयात करताना थोडा शेतकऱ्यांचा विचार करावा. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर आता कुठे कांद्याला थोडा दिलासादायक भाव मिळतो आहे. मात्र, त्यातही सरकार बाहेरून कांदा आयात करून कांद्याच्या भावात घसरण करू पाहतेय.

Share: