Navi Mumbai Lockdown extension | नवी मुंबईत 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

7
0
Share:

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता (Navi Mumbai Lockdown Extension) आणखी आठ दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता (Navi Mumbai Lockdown Extension) आणखी आठ दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. नवी मुंबईत आता रविवार 19 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अणणासाहेब मिसाळ यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

याआधी 2 जुलै ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. हे लक्षात घेता हा लॉकडाऊन आठ दिवस वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालावधीत घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्यास मुभा देण्यात आली आहे

कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनबाबत पालिका प्रशासनाने नियमावली जारी केली आहे.

कुठे कुठे लॉकडाऊन वाढवला?

पुणे-पिंपरी – 13 जुलै ते 24 जुलै
ठाणे – 13 जुलै ते 19 जुलै
नवी मुंबई– 13 जुलै ते 19 जुलै

नवी मुंबईत काय सुरु, काय बंद?

1) आकर्षक आणि नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.

2) टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डरअंतर्गत ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशाचा खाजगी वाहनांना परवानगी असलेल्या जीवनाश्यक वस्तू आरोग्य सेवा आणि या अंतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.

3) सर्व आंतरराज्य बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरकडून कामकाज बंद असेल. तर बाहेरून येऊन बाहेर जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.

4) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल. (Navi Mumbai Lockdown Extension)

5) सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेल्या कामासाठी बाहेर येतील.

6) सार्वजनिक ठिकाणी आकर्षक बाबीच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.

7) व्यावसायिक आस्थापना कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकानांनी त्यांचे कामकाज बंद ठेवावे.

8) सतत प्रक्रिया आणि फार्मासयुटीकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल .
9) डाळ व तांदूळ गिरणी खाद्य आणि संबंधित उद्योग दुग्धशाळा खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांत गुंतलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल.

10) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांचा ऑपरेट करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची

11) वस्तू आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या खालील दुकाने आस्थापना वरील प्रतिबंधा बँका एटीएम विमा आणि संबंधित बाबी, आयटी आणि आयपीएस टेलिकॉम टपाल इंटरनेट आणि डेटा सेवांना वगळण्यात आले आहे.

12) फक्त घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्यास मुभा (Navi Mumbai Lockdown Extension) असेल.

Share: