Navi Mumbai police corona:नवी मुंबईत 20 पोलिसांना कोरोनाची लागण, शहरात कोरोनाची आकडा 1422 वर

6
0
Share:

नवी मुंबई: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तैनात असलेल्या अनेक पोलिसांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मध्ये 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त (प्रशासन) सुरेश मेंगडे यांनी दिली आहे .(Navi Mumbai police corona)

काही दिवसांपूर्वी एपीएमसी पोलीस ठाण्यात पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका आरोपीमुळे 3 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लागण झाली .तसेच सगळे जास्त रुग्ण पोलीस बंदोबस्त मुळे झाली अशी माहिती मिळाली आहे . बंदोबस्त मध्ये असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना लोकांच्या संपर्कात आल्याने आता पर्यंत 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शहरातील बाधित पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे दरम्यान आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र, नाकाबंदी, विनाकारण रस्त्यावर नागरिक अशा सगळ्यांसाठी 12 मार्चपासून पोलीस रात्रीचा दिवस करत आहेत. नागरिकांनी बाहेर येऊ नये यासाठी कधी कठोर भूमिका घेत कारवाईच सत्र सुरु आहे. तर कित्येकदा नागरिकांना विनंतीही केली जात आहे. नियोजन नसल्याने एपीएमसी मार्केट बंद सुरू करण्यात येत आहे सगळे जास्त पोलीस बंदोबस्त एपीएमसी मध्ये लावण्यात आली आहे .एपीएमसी पाचही मार्केट मध्ये रुग्ण सापडले असून शंभरी पेक्षा जास्त रुग्ण फळ,भाजीपला व दाना मार्केट मध्ये आहे.एपीएमसी मुळे गुरुवारी पर्यन्त 548 जणांना कोरोनाची लागण झाली असून 7 जणांची मृत्यू झाली आहे. नवी मुंबईत कोरोनाबधितांची संख्या 1422 वर पोहोचली आहे यातील 47 जणांची मृत्यू झाली आहे.तर 548 जणांनी कोरोनवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

Navi mumbai police corona

Share: