नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेलफेअर असोसिएशनची शेतकऱ्यांसाठी विनामूल्य काशी-अयोध्या वारी

18
0
Share:

नवी मुंबई: प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते की एकदातरी काशी अयोध्या वारी व्हावी, परंतु बिकट परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही.हाच धागा पकडून नवी मुंबई भाजीपाला वेल फेअर असोसिएशनच्यावतीने शेतकऱ्यांशी असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी काशी अयोध्यावारीचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सायंकाळी तुर्भे येथील भाजीपाला बाजारातुन या वारीची सुरुवात करण्यात झाली आहे.शेकडो शेतकरी या आयोध्यावारीत सहभागी होण्यासाठी भाजीपाला बाजारात जमले होते.या वारीचा प्रवास तेरा दिवसांचा आहे.

महाराष्ट्राला संत महात्म्यांचा इतिहास लाभला आहे.यामध्ये देव-देवतांना तितकेच महत्त्व दिले जाते.श्रद्धा आणि भक्तीचा झरा महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यांतून पाझरताना नेहमी पाहायला मिळतो.श्रध्दास्थळांना भेट देऊन दर्शन घेण्याची इच्छा मनोमनी सगळ्यांची असते.गरीब शेतकरी ही याला अपवाद नाही. बिकट परिस्थितीमुळे प्रत्येक शेतकऱ्याला जमतेच असे नाही.त्यामुळे गेली १० वर्षांपासून नवी मुंबई वेल फेअर असोसिएशनच्या वतीने या विनामूल्य वारीचे आयोजन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांशी असलेले नाते जपण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे असे असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले.इच्छुक शेतकऱ्यांची गोकुळाष्टमी च्या पासून नावनोंदणी सुरू करण्यात आली होती.वाराणसी-प्रयाग राज- मल्कापूर-अयोध्या या मार्गे हा प्रवास होणार आहे.जाताना महानगरी व एल टी टी कुर्ला एक्सप्रेस तर येताना कृषिनगर या रेल्वे ने यात्रा धारकांचा प्रवास होणार आहे.

यावर्षी सुमारे ८०० शेतकरी बांधव या वारीत सहभागी झाले आहेत.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष सोपान आहेर, राजीव वऱ्हाडी यांचा मोठा हात भार आहे.

माझ्या आई वडिलांची मी काशी अयोध्या वारी परिस्थितीमुळे करू शकलो नाही.परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना मन मारून राहावे लागते.त्यामुळे शेतकऱ्यांशी नाते जपण्याचा हा मनापासून प्रयत्न आहे.प्रत्येक शेतकऱ्याला एकदाच ही संधी उपलब्ध होईल याची चाचपणी केली जाते.याचा राजकारणा शी कोणताही संबंध नाही.

-सोपान मेहेर,अध्यक्ष नवी मुंबई भाजीपाला वेलफेअर असोसिएशन.

काशी ची यात्रा घडली पाहिजे ही खूप दिवसांची इच्छा होती.ती आज पूर्ण होणार आहे. आयुष्य धन्य झाल्यासारखे वाटत आहे.

-विमल सदगीर,अकोला वारीतील महिला

Share: