नवाब मलिक यांचं सूचक ट्विट. हम होंगे कामयाब!”

23
0
Share:

*नवाब मलिक यांचं सूचक ट्विट. हम होंगे कामयाब!”*

“हम होंगे कामयाब!”, नवाब मलिक यांचं सूचक ट्विट
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Live Updates : ज्या आमदारांनी पाठिंबा दिला, त्यांनी पाठिंबा मागे घेतला आहे का?; न्यायालयाकडून विचारणा
अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रात काय होते? सुप्रीम कोर्टात झाला खुलासा
१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीसह राज्यात राजकीय भूकंप आला आहे. एकीकडे अजित पवार यांच्याविरोधात काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना असताना त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीने मात्र आपण अद्यापही शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासंबंधी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विटरवरुन शेर शेअर केला असून हम होंगे कामयाब! असं सूचक विधान केलं आहे.
ट्विटमध्ये काय म्हटलं आहे ?

अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की,

तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की …

हम होंगें कामयाब ।
राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर रंगलेल्या राजकीय नाट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झालं.

Share: